google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नागरीकांनो सावधान ! कार्तिकीच्या तोंडावर पंढरीत आढळला झिका संशयित रुग्ण

Breaking News

नागरीकांनो सावधान ! कार्तिकीच्या तोंडावर पंढरीत आढळला झिका संशयित रुग्ण

नागरीकांनो सावधान ! कार्तिकीच्या तोंडावर पंढरीत आढळला झिका संशयित रुग्ण


कोरोनाचा हळूहळू विसर पडू लागला असतानाच आता पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर आली असून, कार्तिकी यात्रेसाठी भाविक पंढरीत येण्यास सुरुवात झालेली असतानाच

 झिका व्हायरसचा संशयित रुग्ण पंढरपूर येथे अधून आला असून यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे.

कोरोनाने दोन वर्षे प्रचंड छळ केला आहे, अजूनही यातून उद्योगधंदे पुरते सावरले नाहीत तर काहींचे कंबरडे कायमचे मोडून पडले आहेत. 

प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला असून, घराघरातील व्यक्ती कोरोनाने हिरावल्या आहेत. या एका व्हायरसने जगाला प्रचंड हादरा दिला होता, 

आता कुठे या महामारीचा विसर पडू लागला असतानाच 'झिका व्हायरस  ने डोके काढले आहे. पुण्यात याची चर्चा होऊ लागली असताना, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती 

पण आता झिका संशयित रुग्ण पंढरपूर शहरात आढळून आल्याने, अनेकांचे धाबे दणाणले  आहेत. विशेष म्हणजे, पंढरपूरच्या चार प्रमुख यात्रेपैकी एक असणारी

 कार्तिकी यात्रा तोंडावर आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त भाविक पंढरीत येवू लागले असून पंढरीतील गजबज वाढताना दिसत आहे. 

आणि अशा वेळीच ही एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. त्यामुळे काळजी घेणे हे आत्गा अत्यावश्यक बनले आहे.

येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे आणि या यात्रेसाठी लाखो भाविक येत असतात. 

महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक या वारीसाठी येत असतात. भाविकांचे  येणे आता सुरु झाले आहे. 

यात्रेची तयारीही होत आहे पण अशा वेळीच झिका संशयित रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे तसे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.  

कोल्हापूर, पुणे अशा शहरामध्ये झिकाची चिंता होती पण आता पंढरपूर शहरात देखील झिका व्हायरसचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. 

हा व्हायरस अत्यंत गंभीर आणि  जीवघेणा असल्यामुळे आरोग्य  विभाग देखील खडबडून जागा झाला आहे.

 वारीच्या तोंडावर झिका संशयित रुंग आढळल्याने अधिक चिंतेचा विषय बनला आहे. सदर संशयित रुग्ण हा मुंबईहून पंढरपूरला आला

 असल्याची प्राथमिक माहिती आहे. डेंग्यू सारखीच लक्षणे या झिका व्हायरसच्या लागणीनंतर दिसून येतात 

पंढरीत एक रुग्ण झिका संशयित असला तरी अन्य चार जणांच्या रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले आहेत. 

त्या परिसरातील गर्भवती महिलांची देखील तपासणी  करण्यात येत असून आरोग्य विभाग वेगाने कामाला लागला आहे. नागरिकात देखील खळबळ  उडाली

 असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  मळमळ होणे, डोके दुखणे, ताप येणे अशी झिका व्हायरस लागणीची  

प्राथमिक लक्षणे असून डासांच्या मार्फत त्याचा प्रसार होतो. त्यामुळे उघड्या गटारी, साचलेले पाणी हे नागरिकांच्या जीवावर उठू शकते.  

सद्या तर पंढरपूर शहरातील विविध मठ, धर्मशाळा अशा ठिकाणी भाविकांची गर्दी  वाढू लागली आहे, 

अशा ठिकाणी अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे.

 पण गटारीच उघड्या आणि  तुंबलेल्या असतील तर नागरिकांनी काळजी घ्यायची तरी कशी ? असा सवाल  उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Post a Comment

0 Comments