जिल्ह्यातील साखर कारखान्याची ऊस दाराची कोंडी अभिजीत पाटील यांनी फोडली सांगोला तालुका सहकारी
साखर कारखान्याचा उच्चांकी दर २७००रू. प्रति टन पहिला हाप्ता जाहीर - चेअरमन अभिजीत पाटील
प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे (९५०३४८७८१२)
दि.१८-११-२०२३ बारा वर्षे बंद अवस्थेत असलेला सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याने सुरू केला असता श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन
अभिजीत पाटील यांनी यशस्वी गाळप करून सन२०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी येणाऱ्या ऊसाला २७००रू. पहिला हाफ्ता देण्याची घोषणा श्री अभिजीत पाटील यांनी केली आहे..
सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी सभासदांनी आपला सांगोला कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करण्याची भूमिका ठिकाणी ठेवावी असे उद्गार अभिजीत पाटील यांनी काढले. सांगोला साखर कारखान्याचे चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराचे कोंडी अभिजीत पाटील यांनी केल्यामुळे एक एक कारखाने हळूहळू आपले दर वाढवून देत आहेत
त्याच अनुषंगाने अभिजीत पाटील यांनी पहिल्यांदा २५०० रुपये दर जाहीर केला असता त्यानंतर आज दिनांक २७००रू प्रति टन दर जाहीर केला
असल्याचे श्री अभिजीत पाटील यांनी यावेळी सांगितले सर्वसामान्य कष्टकऱ्याला घामाचा दाम मिळाला तरच शेतकरी सुजलाम सुफलाम होईल असे यावेळी अभिजीत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले
उच्चांकी जाहीर दर केल्यामुळे चेअरमन अभिजीत पाटील तसेच कार्यकारी संचालक व सर्व संचालक मंडळांचे सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्याकडून कौतुक होत आहे


0 Comments