google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत श्रमदान शिबीर संपन्न

Breaking News

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत श्रमदान शिबीर संपन्न

 सांगोला नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत श्रमदान शिबीर संपन्न


सांगोला : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याकरिता “इंडियन स्वच्छता लीग 2.0” व “स्वच्छ पंधरवडा” स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सांगोला

 नगरपरिषदेच्या वतीने रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता “एक साथ,एक तास श्रमदान” शिबीर राबविण्यात आले.

स्वच्छ भारत अभियान 2.0 (ना.) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय,भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या 

“इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत “स्वच्छ पंधरवडा” व “स्वच्छता ही सेवा” या अभियाना अंतर्गत ही मोहीम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. 

सांगोला नगरपरिषदेमार्फतही १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सदर अभियान राबविण्यात येत असून या अभियानाचाच एक भाग म्हणून “इंडियन स्वच्छता लीग 2.0” व “स्वच्छ पंधरवडा”

 अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याकरिता स्वच्छ भारत अभियानाची रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता “एक साथ,एक तास श्रमदान” शिबीर राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने

 सांगोला नगर परिषदेमार्फत विविध ठिकाणी श्रमदान अभियान राबवण्यात आले.सदर अभियानांतर्गत अंदाजे १० ते १३ टन कचरा गोळा करण्यात आला असून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांगोला येथे वाहतूक करण्यात आला.

सुमारे २० ठिकाणी राबवण्यात आलेल्या या अभियानात सर्व पदाधिकारी व शासकीय कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. तसेच या अभियानात महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, सांगोले येथील श्रीसदस्य योगेश तारे,

 नवनाथ फुले,शिवाजी केदार व इतर श्रीसदस्य उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन सांगोला नगरपरिषदेच्या शहर समन्वयक तेजश्री बगाडे यांनी केले 

तर,हे अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक स्वप्निल हाके यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र गायकवाड,रोहित गाडे,अमित कोरे व विनोद सर्वगोड यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली.

पर्यावरण संवर्धनाचा एक चांगला संदेश पोहोचेल :

या अभियानाला सांगोला शहरातील नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या योजनेचा मूळ हेतू कांही प्रमाणात तरी साध्य झाल्याचे समाधान आहे. यातून पर्यावरण संवर्धनाचा एक चांगला संदेश शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचेल.

                          – कार्यालयीन अधीक्षक स्वप्निल हाके

Post a Comment

0 Comments