google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्याच्या जिगरबाज शेतकऱ्याने केळीला मिळवला एक्स्पोर्टपेक्षा जास्त दर, पहिल्याच प्रयत्नात घेतलं सव्वा पाच कोटींचं उत्पन्न

Breaking News

सांगोल्याच्या जिगरबाज शेतकऱ्याने केळीला मिळवला एक्स्पोर्टपेक्षा जास्त दर, पहिल्याच प्रयत्नात घेतलं सव्वा पाच कोटींचं उत्पन्न

 सांगोल्याच्या जिगरबाज शेतकऱ्याने केळीला मिळवला एक्स्पोर्टपेक्षा जास्त


दर, पहिल्याच प्रयत्नात घेतलं सव्वा पाच कोटींचं उत्पन्न

सांगोला या जिल्ह्याची डाळिंबासाठी  ओळख होती. मात्र डाळिंबावर सातत्याने होऊ लागलेल्या विविध रोगांमुळे येथील डाळिंब उत्पादक शेतकरी पार उद्ध्वस्त होऊन गेला होता.

यातच अनेकांनी डाळिंबाला पर्याय शोधायला सुरुवात केली. 30 वर्षे डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या एका शेतकऱ्याने इथे केळीची लागवड करुन एक्स्पोर्टपेक्षा जास्त भाव मिळवून दाखवला. सांगोला  तालुक्यातील हलदहिवडी येथील प्रताप लेंडवे यांच्या

 150 टन केळीला राज्यातील सर्वात विक्रमी म्हणजे 35 रुपये किलो एवढा भाव मिळाला आहे. सध्या लेंडवे यांची केळी ही सफरचंदाचे नंदनवन असणाऱ्या काश्मीर इथे विक्रीसाठी जात असून एकरी किमान 14 लाखांचे उत्पन्न त्यांना मिळू लागले आहे.

 लेंडवे यांच्या बागेतील 150 टन केळी श्रीनगरच्या व्यापाऱ्याने 35 रुपये किलोप्रमाणे विकत घेतली. आठ दिवसात रोख पैसे मिळणार असल्याने लेंडवे यांना केवळ 10 महिन्यात डाळिंबापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळाल्याचा आनंद आहे.

 सध्या परदेशात निर्यात होणाऱ्या केळीचा दर 30 ते 32 रुपये असताना केवळ उच्च प्रतीच्या उत्पादनामुळे लेंडवे यांना 35 रुपये प्रमाणे भाव मिळाला आहे. तसे निर्यात केलेल्या मालाला एक ते दोन महिन्यानंतर पैसे मिळतात मात्र देशातच जास्त

 भावाने माल विकून केवळ आठ दिवसात लेंडवे यांना विकलेल्या मालाचे पैसे मिळू लागले आहेत. सध्या लेंडवे यांच्या बागेतून रोज 18 टनांची एक गाडी श्रीनगरकडे जात असून आतापर्यंत 100 टन माल पाठवून झाल्याचे प्रताप सांगतात.

नोकरीला रामराम ठोकून शेतीत विविध प्रयोग

इंग्लिश विषय घेऊन एम बीएड केलेल्या प्रताप यांनी सुरुवातीला दोन वर्षे नोकरी देखील केली. मात्र शेतीची आवड आणि मातीची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने

 त्यांनी नोकरीला रामराम ठोकून पुन्हा शेतीत विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला डाळिंबाच्या शेतीतून भरघोस उत्पन्न घेणाऱ्या प्रताप यांना अलिकडच्या काळात सातत्याने येऊ लागलेला

 मर, तेल्या सारख्या रोगाने हैराण केले. त्यांनी डाळिंब काढून पहिल्या वर्षी येथे मका लावला. मात्र भरघोस उत्पन्न घेण्याची सवय लागलेल्या प्रताप यांनी मित्राच्या सल्ल्याने पहिल्या टप्प्यात साडेसात हजार जैन

 कंपनीची केळीची रोपे आणून त्याची पावणे सहा एकर क्षेत्रात लागवड केली. प्रत्येक रोपांमध्ये 7 बाय 5 अंतर ठेऊन प्रताप यांनी ही लागवड केली. 

कमी पाण्यामुळे संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन करुन घेतल्यावर प्रताप यांनी वेळच्या वेळी खाते, 

औषधे याची मात्र देत राहिले. दहा महिन्यानंतर घडाची उंची अकरा फुटांपर्यंत गेली असून प्रत्येक झाडाला 55 ते 60 किलो एवढा माल लागला आहे. खरेतर आपले थोडे नियोजन चुकले असून प्रत्येक फणीला साधारण 40 किलोपर्यंत वजन गरजेचे असल्याचेही प्रताप सांगतात.

काश्मीरला जाणाऱ्या केळीतून सव्वा पाच कोटीचे उत्पन्न

केळांना डाग पडू नये म्हणून विशेष काळजी देखील यावेळी घेतली आहे. अतिशय काटकसर, योग्य नियोजन, कष्ट व देखभला करत असल्याने एकरामध्ये 14 लाखांपर्यत उत्पन्न निघाले आहे. 

यासाठी प्रत्येक झाडामागे प्रताप यांनी 125 रुपये म्हणजेच एकरी सव्वा लाख रुपये एवढा खर्च करून एकरी 14 लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेतले आहे.

 सध्या 150 टन केली हे काश्मीरला चालले असून यातून त्यांना जवळपास सव्वा पाच कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. अजूनही 50 ते 60 टन केळी बागेत असल्याने यालाही याच पद्धतीने भाव मिळू शकणार आहे.

 केवळ पावणे सहा एकर क्षेत्रात काश्मीरला जाणाऱ्या केळीतून सव्वा पाच कोटीचे उत्पन्न मिळवणाऱ्या प्रताप यांना डाळिंबाच्या दुपटीपेक्षा जास्त उत्पन्न पहिल्याच प्रयत्नात मिळाल्याचा आनंद आहे.

 डाळिंबाच्या रोगाला वैतागलेल्या शेतकरी बांधवानी केळीकडे वळावे असे आवाहन प्रताप लेंडवे करतात. एका जागी इतक्या चांगल्या प्रतीचा प्लॉट आम्हाला दुसरीकडे न मिळाल्याने आम्ही या मालाला निर्यातीपेक्षा जास्त भाव दिल्याचे व्यापारी महेश महाकुंडे आणि संदीप पाटील सांगतात. 

आम्हाला चांगल्या प्रतीच्या 10 टन मालासाठी सुद्धा 40 ते 50 किलोमीटर फिरावे लागते मात्र प्रताप यांचा माल अतिशय चांगल्या प्रतीचा असल्याने आम्ही त्यांना एक्स्पोर्टपेक्षा जास्त भाव दिल्याचे महेश महाकुंडे यांनी सांगितले.

सांगोल्याचा शेतकरी हा कमी पाण्यात आणि खडकाळ जमिनीत आपल्या कष्टातून नंदनवन फुलवतो याचे उदाहरण पुन्हा एकदा प्रताप लेंडवे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. शासननाने शालेय पोषण आहारामध्ये शाळेतील मुलांना खिचडी सोबत केळी देण्याचा निर्णय घ्यावा.

जेणेकरुन मुलांना पौष्टिक आहार मिळेल आणि शेतकऱ्यांनाना देखील केळीच्या उत्पादनातून पैसे वाढवून मिळतील. त्यामुळे शेतकरी अजून मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन वाढवू शकेल, अशी अपेक्षा यावेळी शेतकरी प्रताप लेंढवे यांनी केली.

Post a Comment

0 Comments