मोठी बातमी..सांगोला नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी डॉ. गवळी
सांगोला : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
तब्बल ४० दिवसांनंतर सांगोला नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी पुनःश्च डॉ. सुधीर गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
२३ ऑगस्ट रोजी नागपूर येथे सहायक आयुक्त गट-अ म्हणून डॉ. सुधीर गवळी यांना पदोन्नती मिळाली होती. परंतु मंगळवारी त्यांनी सांगोला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
सांगोला तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांचा कार्यकाळ संपल्याने ते सेवानिवृत्त झाले. सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पदोन्नती मिळाली म्हणून ते नागपूर येथे रूजू झाले. परिणामी तालुका व शहराच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या कार्यालयाची प्रमुखपदे रिक्त असल्याबाबत अनेक चर्चा व्यक्त होत होत्या.
दरम्यान, मध्यंतरी आमसभा प्रमुख अधिकारी नसताना झाली. यामुळेदेखील चांगलाच विषय उपस्थित त्यांनी लाऊन धरला होता. ३० डिसेंबर २०२२ रोजी सांगोला नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी डॉ. सुधीर गवळी यांची नियुक्ती करण्यात आली होती..
२३ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची नागपूर येथे सहाय्यक आयुक्त गट-अ पदी पदोन्नती झाली. यावेळी मागील ४० दिवस मुख्याधिकारी पद रिक्त होते. पुनःश्च सांगोला नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी सुधीर गवळी यांनी पदभार स्वीकारला आहे.
0 Comments