पत्रकार सतिशभाऊ सावंत यांना फलटण पत्रकार संघाचा
पुणे विभागीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
सांगोला/प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे
सांगोला नगरीचे माजी नगरसेवक जेष्ठ, पत्रकार सतीशभाऊ सावंत यांना फलटण तालुका पत्रकार संघ पुरस्कृत शिव संदेशकार माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर आदर्श पत्रकार पुणे विभागीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
सांगोला नगरीचे मा. नगरसेवक, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष, नगरसेवक परिषद असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष, दैनिक सांगोला नगरी व दैनिक माणदेश नगरी सोलापूरचे संपादक, निर्भीड पत्रकार सतीशभाऊ सावंत यांना फलटण, जि. सातारा येथील
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ पुरस्कृत शिव संदेशकार माजी आमदार कॉ.हरिभाऊ निंबाळकर पुणे विभागीय पुरस्कार आदर्श पत्रकार जाहीर झाला आहे.
सतीश भाऊ सावंत यांनी ग्रामीण भागात गेली 25 वर्ष निर्भीडपणे पत्रकारिता करीत आहेत. निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी ग्रामीण भागात दोन दैनिक यशस्वीपणे चालवून आदर्श निर्माण केला आहे.
सांगोला शहर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात व माणदेशात त्यांनी अनेक नवोदित पत्रकार तयार केले आहेत. नवोदित पत्रकारांना त्यांनी वाव दिला असून पत्रकारांचे त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे संघटन तयार केले आहे.
पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी नावलौकिक केला आहे. पत्रकारांच्या अडीअडचणी सुख-दुःखात रात्रंदिवस काम करीत आहेत. जनतेचे निर्भीडपणे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या पत्रकारितेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सतिशभाऊ सावंत यांचावर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.


0 Comments