google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नागरिकांनो सावधान! अनोळखी व्यक्ती, भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्याला द्या; सोलापूर जिल्ह्यात कलम १४४ चे आदेश

Breaking News

नागरिकांनो सावधान! अनोळखी व्यक्ती, भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्याला द्या; सोलापूर जिल्ह्यात कलम १४४ चे आदेश

 नागरिकांनो सावधान! अनोळखी व्यक्ती, भाडेकरूची माहिती 

पोलिस ठाण्याला द्या; सोलापूर जिल्ह्यात कलम १४४ चे आदेश 


सोलापूर जिल्ह्यात कलम १४४ चे आदेश ७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा,

जुने वाहन विक्री खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना खालील कृत्यांना बंदी घालत आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.

कोणत्याही अनोळखी नवीन राहावयास येणाऱ्या व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईलअथवा राहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलिस ठाण्याला माहिती देण्यात यावी, असे निर्देशित केले आहे.

Post a Comment

0 Comments