सांगोला तालुक्यातील खिलारवाडी चे सुपुत्र प्रदीप खिलारे सेट परीक्षा उत्तीर्ण
सांगोला :- खिलारवाडी ता. सांगोला येथील सुपुत्र प्रदीप अशोक खिलारे यांनी नुकत्याच झालेल्या महाविद्यालयीन प्राध्यापक होण्यासाठीची आवश्यक असणारी सेट
परीक्षा रसायनशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातून गरिबीतून शिक्षण घेऊन हे उत्तुंग यश त्यांनी मिळवले आहे.
हे यश मिळवत असताना त्यांना प्राचार्य डॉ.मधुसूदन बचुटे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल घनवट, अक्कलकोट येथील प्रा.धनय्या कौठगीमठ,
सांगोला येथील प्रा.राहुल भोसले, के .बी .पी .महाविद्यालय पंढरपूरचे सहयोगी प्राध्यापक.डॉ.दत्तात्रय काळेल तसेच प्रा.डॉ.शशिकांत खिलारे व आर्किटेक्ट इंजिनियर हनुमंत खिलारे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल पंचक्रोशीमध्ये त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.


0 Comments