खळबळजनक ! सख्ख्या बहिणीच्या मदतीने अल्पवयीन
मुलीवर अत्याचार; सोलापुरातील धक्कादायक घटना
सख्ख्या बहिणीच्या मदतीने नराधमाने बहिणीच्या घरी व इतर ठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरोधात वारंवार अत्याचार केला.
याप्रकरणी बहीण-भावाच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : सख्ख्या बहिणीच्या मदतीने नराधमाने बहिणीच्या घरी व इतर ठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरोधात वारंवार अत्याच केला. याप्रकरणी बहीण-भावाच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
15 वर्षीय मुलगी शाळेतून घरी जात असताना तिला रस्त्यात अडवून 22 वर्षीय तरुणाने मोटरसायकलवरून बहिणीच्या घरी नेऊन अत्याचार केला. त्यानंतर एक महिन्याने पीडित मुलीला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे'
असे म्हणत तिला पुन्हा बहिणीच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर 17 मे रोजी या आरोपीने पीडित मुलीला नातेवाईकांच्या घरी नेले. त्यावेळीही त्याने अत्याचार केला.
दरम्यान, सातत्याने होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी तातडीने सदर बझार पोलीस ठाणे गाठत दोघा सख्ख्या बहीण-भावाच्या विरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार एम. ए. जाधव हे करत आहेत.


0 Comments