ब्रेकिंग न्यूज ...सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर
दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री शांतराणी चक्रवर्ती यांचे निधन
मिथुन चक्रवर्ती एकेकाळी कोलकत्यातील जोराबागन भागात आई-वडील आणि चार भावंडासोबत राहत होते, पण जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनयाच्या जगात नाव कमावले तेव्हा तो आपल्या आई वडिलांना घेऊन मुंबईत राहू लागला.
ब्रेकिंग न्यूज ...सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री शांतराणी चक्रवर्ती यांचे निधन झाले आहे.
शांतराणी ह्या आजाराने त्रस्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिथुन यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्तीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सध्या त्यांची आई मुलगा मिथुन चक्रवर्तीसोबत मुंबईत राहत होती. मिथुन चक्रवर्ती आईच्या निधनावर पश्चिम बंगालमध्ये भाजपपासून ते तृणमूल कांग्रेसच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.यासोबतच चित्रपट जगतातील सेलिब्रिटीनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
कोविड दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांचे वडील बसंतकुमार चक्रवर्ती यांचे २१ एप्रिल २०२० रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाले आणि यावेळी मिथुनने आपल्या आईलाही गमावले.

0 Comments