google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक; 'या' महिन्यानंतर निवडणूक घ्या; सहकार विभागाने दिले 'हे' कारण

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक; 'या' महिन्यानंतर निवडणूक घ्या; सहकार विभागाने दिले 'हे' कारण

ब्रेकिंग न्यूज...महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक;


'या' महिन्यानंतर निवडणूक घ्या; सहकार विभागाने दिले 'हे' कारण 

जून अखेरीस होणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सहकार संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

त्यामुळे राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत.

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबविणे कठीण जाते. त्यासोबतच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशा संस्थांचं निवडणूक कामकाज पूर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते. याच कारणांमुळे निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलं आहे.

राज्यात ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यापैकी ४९,३३३ सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत.

राज्यात ३० जूननंतर पर्जन्यमानाचं स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

अशात जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभागी होता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे . यामुळे हजारो सहकारी आणि गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकारी आणि मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments