मुलाणी व वलेकर यांचे स्तुत्य उपक्रम
सांगोला. (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला) – शेती आणि मातीवर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी, हरित क्रांतीचे प्रणेते तथा पहिले शेतकरी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य
साधून उदनवाडी ग्रामपंचायत हद्दीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी शेती नांगरत असताना बी-बियाण्यांचे वाटप महाराष्ट्र विधिमंडळ माकप कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी व स्पर्धा
परीक्षा सल्लागार अरविंद वलेकर यांनी संयुक्त विद्यमाने यांचा स्तुत्य उपक्रम करण्यात आला. तसेच, उदनवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. कुसुम अशोक वलेकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्याची आर्थिक व्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आपल्याला अन्न मिळते. त्यामुळे महाराष्ट्रात कृषी दिनाचे खूप महत्व आहे. दि. 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
1 जुलैपासून सुरू होणारा हा आठवडा आणि 7 जुलैला संपणार आहे. बऱ्याच ठिकाणी हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल,
याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते. नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली.
शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच त्यांनी राज्यात 'कृषी विद्यापीठा'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली.
1972 च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग त्यांनी दाखवला आहे असे मुलाणी सांगितले. हीच त्यांची आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. भाई गणपतराव देशमुख यांची प्रेरणा घेऊन तसेच
जून महिन्या उलटून गेल्या नंतर शेतकरी शेतीच्या कामात रमला आहे त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही बी - बियाणे वाटप केले आहे, असे मुलाणी म्हणाले.
तर स्पर्धा परीक्षा सल्लागार अरविंद वलेकर म्हणाले की, महाराष्ट्र शासन दि. 01 जुलै हा कृषी दिन साजरा करतो. शेतकरी शेतात घाम गाळून, सोन पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम बळीराजाच्या उपक्रमासाठी
भ्रमणध्वनी वरून पूर्व कल्पना देऊन देखील गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दशरथ लवटे, तलाठी अर्जना लोखंडे अनुपस्थित होते त्यामुळे गावात अतितीव्र नाराजी पसरली आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळ कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी, स्पर्धा परीक्षा सल्लागार अरविंद वलेकर, उदनवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. कुसुम अशोक वलेकर,
बालेखान शेख, दिगंबर शिंगाडे, समर्थ वलेकर, विकास वलेकर, संदीप सरगर, इलाइ मुलाणी, वामन वलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाची गावोगावी, तालुक्यात तसेच जिल्ह्यात चर्चा रंगली असून शेतकऱ्यांना मदत केल्याच्या अनुषंगाने या उपक्रमाबद्दल मुलाणी व वलेकर यांचे कौतुक होत आहे.


0 Comments