सांगोला तालुक्यातील उदनवाडी करिता सक्षम गाव कामगार तलाठी द्या ;
उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जोरदार मागणी
सांगोला. (प्रतिनिधी) – मौजे. उदनवाडी करिता सक्षम गाव कामगार तलाठी द्या असे रुग्ण हक्क परिषद शाहरुख मुलाणी व स्पर्धा परीक्षा
सल्लागार अरविंद वलेकर यांनी उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दरम्यान मौजे उदनवाडी ता. सांगोला हे गाव मिरज पंढरपूर रोड वर आहे. आमच्या गावातून बेलवन नदी वाहते. या नदी पात्रातून रात्री वाळू माफिया वाळू चोरी करत असतात.
त्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गावातील महिला ज्यावेळी नदी किनारी कपडे धुण्यासाठी जातात तेव्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाळू माफियांच्या दहशतीमुळे त्यांच्या विरुद्ध गावात कोणीही तक्रार देत नाही. परंतु, गावातील नागरिक आम्हाला भ्रमणध्वनी वरून सतत कळवत असतात.
आदर्श गाव म्हणून आम्हाला आमच्या गावाची ओळख निर्माण करायची आहे.
उक्त प्रकरणी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन सहानुभूतीने दिवस असो व रात्र उत्तम प्रकरणे गावात जनतेसाठी उपलब्ध असणारे व सक्षमपणे काम करणारे
तलाठी उदनवाडी गावाकरिता द्यावे असे जोरदार मागणी रुग्ण हक्क परिषद शाहरुख मुलाणी व स्पर्धा परीक्षा सल्लागार अरविंद वलेकर यांनी उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


0 Comments