google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... समान नागरी कायद्याला ठाकरे गट पाठिंबा देणार? वरिष्ठ नेत्यांशी करणार चर्चा अन्...

Breaking News

मोठी बातमी... समान नागरी कायद्याला ठाकरे गट पाठिंबा देणार? वरिष्ठ नेत्यांशी करणार चर्चा अन्...

मोठी बातमी... समान नागरी कायद्याला ठाकरे गट पाठिंबा देणार? वरिष्ठ नेत्यांशी करणार चर्चा अन्...


केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा आणण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांची 

भूमिका काय असा सवाल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता. उद्धव ठाकरे गटाची काय भूमिका असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ठाकरे गट समान नागरी कायद्याला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . यावर ठाकरे गटातील वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे . 

बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचा समान नागरी कायद्याला पाठिंबा , अशी त्यांची भूमिका होती . 

शिवाय शाखाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी थेट भाष्य करत म्हटले होते की , समान नागरी कायद्याला पाठिंबा असेल पण बाकीच्या बाबी देखील लक्षात घ्या ; 

असं वक्तव्य त्यांनी केलं होतं .त्यामुळे उद्धव ठाकरे समान नागरी कायद्याला पाठिंबा देतील , असं बोललं जातंय .

 ' साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे . 

शरद पवार काल बोलत होते . त्यावेळी त्यांनी जैन आणि शिख समाजाचा मुद्दा उपस्थित केला होता .समान नागरी कायद्याबाबत शरद पवार काल म्हणाले की , पंतप्रधानांनी समान नागरी कायद्याबद्दल भाष्य केलं .

 एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात,असं ते समान नागरी कायद्याबाबत शरद पवार काल म्हणाले की, पंतप्रधानांनी समान नागरी कायद्याबद्दल भाष्य केलं. एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात,

 असं ते म्हणाले. परंतु शिख, जैन समाजाविषयी केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी.शिख समाजाची समान नागरी कायद्याला समर्थन देण्याची मानसिकता नाही, अशी माहिती माझ्याकडे आहे. 

विधी आयोगाच्या सूचना आलेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पंतप्रधानांनी याबाबत स्पष्टता द्यावी. त्यानंतर माझा पक्ष यासंदर्भात भूमिका घेईल, असं पवार म्हणाले होते.

Post a Comment

0 Comments