google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Breaking News

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील घटना..

 सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची


आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील घटना..

सोलापूर : माहेराहून टीव्हीसाठी पैसे घेऊन यावे म्हणून सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून माढा तालुक्यात निमगाव (टें, ता. माढा) येथे 

एका २४ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर माहेरच्या लोकांनी चक्क सासरच्या दारातच अंत्यसंस्कार करून संताप व्यक्त केला.

प्राजक्ता रोशनकुमार चट्टे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी मयत प्राजक्ताची आई सविता दत्तात्रेय लोंढे (रा. पिंपळनेर, ता.माढा) हिने फिर्याद दिली 

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मयत प्राजक्ताचे लग्न १५ एप्रिल २०२० रोजी निमगाव (टें) येथील रोशनकुमार चट्टे यांच्याबरोबर झाले होते.

 लग्न झाल्यानंतर तीन वर्षांपासून पती रोशनकुमार, सासरे नारायण चट्टे व सासू कौशल्या चट्टे हे तिघे प्राजक्तास माहेरहून टीव्ही घेऊन ये, चारचाकी गाडी घेण्यासाठी लाख रुपये आण म्हणून छळ करत होते.

१७ जून २०२३ रोजी सासरे नारायण चट्टे यांनी विनयभंग केला. यावरून झालेल्या भांडणात प्राजक्ताने १८ जून रोजी सकाळी घरातच विष प्राशन केले. तिच्यावर अकलूज येथे उपचार सुरू असताना २६ जून रोजी प्राजक्ताचा मृत्यू झाला.

टेंभुर्णी पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पती रोशनकुमार चट्टे व सासू कौशल्या चट्टे या दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरीष जोग करीत आहेत.

या घटनेनंतर प्राजक्ताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. सोमवारी दुपारी १२.३० वाजता मृतदेह निमगावमध्ये आला मात्र नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. 

सासरच्या लोकांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. दुपारी २.३० वाजे दरम्यान गुन्हा दाखल झाला अन मृतदेह ताब्यात घेतला.

Post a Comment

0 Comments