google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात पाकचा राष्ट्रध्वज असणारे फुगे विक्रीला, मुस्लीम बांधवाच्या सतर्कतेने मोठा वाद टळला; पवार नामक विकृत ताब्यात

Breaking News

सोलापुरात पाकचा राष्ट्रध्वज असणारे फुगे विक्रीला, मुस्लीम बांधवाच्या सतर्कतेने मोठा वाद टळला; पवार नामक विकृत ताब्यात

 सोलापुरात पाकचा राष्ट्रध्वज असणारे फुगे विक्रीला, मुस्लीम


बांधवाच्या सतर्कतेने मोठा वाद टळला; पवार नामक विकृत ताब्यात

सोलापुरातील शाही आलमगीर ईदगाह मैदानाबाहेर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज असणारे फुगे विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 

पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मुस्लीम बांधवांनीच या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

 हे फुगे मुस्लीम समुदायातील एखाद्या व्यक्तीने घेतले असते आणि त्याचा व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल असता, 

तर मोठा वाद झाला असता. पण मुस्लीम बांधवांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य वाद टळला.

सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावरी शाही आलमगीर ईदगाह मैदान परिसरात गुरुवारी हा प्रकार घडला. या ठिकाणी एक फुगेवाला पाकिस्तानजिंदाबाद, लव्ह पाकिस्तान असा 

मजकूर लिहिलेल्या फुग्यांची विक्री करत होता. ही बाब ईदच्या नमाजासाठी येणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या नजरेस पडली.

 त्यांनी तत्काळ ही माहिती या भागात तैनात असणाऱ्या पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी फुगे विक्रेत्याला ताब्यात घेतले. अजय पवार असे या विक्रेत्याचे नाव आहे. 

तो शहरातील विजापूर रोडवरील पारधी वस्ती भागात राहतो. फुगे विक्रेत्याचे नाव अजय पवार

अजय पवार पाकिस्तानचे नाव व राष्ट्रध्वज असणारे फुगे विक्री करत असल्याची बाब लक्षात आल्यानतंर 

मुस्लीम बांधवांनी त्याला जाब विचारला. तसेच हे फुगे किती जणांना विक्री केले,अशी विचारणाही केली. त्यावर या 

अजय पवारला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे नमाजासाठी आलेल्या व्यक्तींनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

MIM चे पोलिसांना निवेदन

एमआयएम नेते रियाज सय्यद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे. 

मुस्लीम धर्मीयांच्या सणाच्या दिवशी ईदगाह मैदानावर पाक समर्थनार्थ फुग्यांची विक्रे करणे गंभीर बाब आहे. हे फुगे विक्री करणारे सर्वसामान्य व गोरगरीब लोक आहेत. 

पण यामागे षडयंत्र रचणारे दुसरेच लोक आहेत. त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सय्यद यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments