google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज... आता कागदपत्रांची फाइल सोबत बाळगायची गरज नाही आता जनतेला मिळणार हेल्थ कार्ड; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

Breaking News

ब्रेकिंग न्यूज... आता कागदपत्रांची फाइल सोबत बाळगायची गरज नाही आता जनतेला मिळणार हेल्थ कार्ड; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

 ब्रेकिंग न्यूज... आता कागदपत्रांची फाइल सोबत बाळगायची गरज नाही


आता जनतेला मिळणार हेल्थ कार्ड; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा 

तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेलात तरी तुमचा वैदयकीय इतिहास डॉक्टरांना कळावा, यासाठी कागदपत्रांची फाइल सोबत बाळगायची गरज नाही.

आरोग्य विभागाने त्यासाठी ‘आभा हेल्थ कार्ड’ तयार केले आहे. त्यावर वैद्यकीय पार्श्वभूमी, उपचार यांची माहिती संकलित केली जाईल. त्यामुळे उपचार घेणे सोपे होणार असून, पुढील एका वर्षात राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे हेल्थ कार्ड तयार केले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली.

निमित्त होते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित ‘देवदुतांचा सन्मान सोहळा’ व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मुलाखतीचे. आरोग्यमंत्री यांची मुलाखत संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी घेतली.

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. के. जैन, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, राज्य संघटक संजय भोकरे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी,

राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे हेल्थ कार्ड, पत्रकारांचा विमा आणि आरोग्य क्षेत्रातील खासगीकरण यासह अनेक महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक बाबींवर आरोग्यमंत्री सावंत यांनी संवाद साधला.

आभा हेल्थ कार्डमध्ये आरोग्याची स्थिती तपासण्या, वैद्यकीय इतिहास याची डिजिटल नोंद होत असते. वर्षभरापूर्वी हे कार्ड तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखो नागरिकांचे कार्ड तयार झालेले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, हेल्थ कार्ड हे खऱ्या अर्थाने तुमच्या आरोग्याची कुंडली असते. या कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदविली जाते.

या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याची माहिती मिळवू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो.

Post a Comment

0 Comments