google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दारुबंदी व अवैध धंदे बंद न झाल्यास सिंह सेना संघटना संघटनेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार..

Breaking News

दारुबंदी व अवैध धंदे बंद न झाल्यास सिंह सेना संघटना संघटनेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार..

 दारुबंदी व अवैध धंदे बंद न झाल्यास



सिंह सेना संघटना  संघटनेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार..

गार्डी ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे दारुबंदी, मटका, सिंधी असे व्यवसाय सुरु आहेत. गार्डीची लोकसंख्या ६१०० इतकी असून


गावामध्ये गेली

 ३५ वर्षापासून दारुबंदी होती परंतु सध्या गार्डी गावात दारु व अवैध धंदे जोमात चालू आहे. 


१. सामाजिक सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे.

 २. दारु पिणाऱ्या संख्येत वाढ होवून दारुच्या आहारी गेलेमुळे अनेकांचे संसार उध्दवस्त झालेले आहेत.

 ३. दारुच्या व्यसनाच्या पुर्ततेसाठी लोक संसारोपयोगी वस्तू व घरातील दागिने चोरुन विकत आहेत. त्यामुळे घरात आर्थिक व्यवस्था बिकट झालेली आहे.

 ४. घरातील लहान मुलावर विपरीत परिणाम होवून मुलांची मानसिकता ढासळलेली आहे. अशा प्रकारे घरातील लहान मुले भेदरलेल्या व्यवस्थेत असून शिक्षणापासून वंचित आहेत. परिणामी तरुण पिढी उध्दवस्त होत आहे.

 ५. दारु व्यवसनामुळे मुले व स्त्रियांची शारिरीक व मानसिक छळ होत आहे. 

६. दारु व्यवसनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होवून खून, बलत्कार, दरोडा, चोरी या सारखे गुन्हे वाढत आहेत. ७. दारु व्यवसनामुळे मयत होणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे काही चुकी नसताना स्त्रियांना विधवेचे जीवन जगावे लागत आहे. 

यामुळे सरकार ला जरी कराची प्राप्ती होत असली तरी दारु व्यवसायसुरु करणे म्हणजे येणारी तरुण पिढी व सुव्यवस्था समाज उध्दवस्त करणे होय त्यामुळे असे सामाजिक विघाटक गोष्ट घडू देवू नये अशी आपणास नम्र विनंती आहे. 

तरी सदर गावातील अवैध धंदे १५ दिवसात बंद करावेत अशी आमचे संघटनेची मागणी केली आहे सदरचे अवैध धंदे बंद न झालेस संघटनेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणे भाग पडेल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.

Post a Comment

0 Comments