google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघातात चुलता पुतण्याचा जागीच मृत्यू ! पुणे सोलापूर महामार्गावर घडली घटना

Breaking News

भीषण अपघातात चुलता पुतण्याचा जागीच मृत्यू ! पुणे सोलापूर महामार्गावर घडली घटना

 भीषण अपघातात चुलता पुतण्याचा जागीच मृत्यू ! पुणे सोलापूर महामार्गावर घडली घटना 


पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली व मालवाहतूक करणारा ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय ही घटना 

दौंड तालुक्यातील पाटस जवळील भागवतवाडीत घडलीय.या अपघातात चुलता-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला.

गुरुवारी दि. १५ जून रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास पाटस भागवतवाडी याठिकाणी हा अपघात झाला.

 यामध्ये ट्रकचालक बिभीषण बालाजी हाके वय ३२ वर्षे तर वैभव सुधाकर हाके वय १८, रा. घोटाळा बंडगरवाडी, ता. बसवकल्याण, रा. कर्नाटक या चुलत्या- पुतण्याचा मृत्यू झाला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,पाटस येथील भागवतवाडी जवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्ता पार करत होता, 

दरम्यान पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ( वाहन क्रमांक के. ए.-३९/९४५५) ट्रॅक्टरच्या ट्रेलरला धडक दिली आणि अपघात झाला, यात ट्रकचा चेंदामेंदा झाला.

ट्रक चालक असणाऱ्या बिभीषण हाके व त्याच्या सोबत असणारा त्याचा पुतण्या वैभव हाके याचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती

 मिळताच पाटस पोलीस चौकीचे उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस शिपाई समीर भालेराव, संदीप कदम, हनुमंत भगत यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

Post a Comment

0 Comments