प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर, योजनेसाठी सांगोला व मंगळवेढा नगरपरिषदेची
निवड, शासनाच्या विविध ८ योजनांचा मिळणार लाभ
काही दिवसांपूर्वी देशातकोरोना - १९ आलेल्या च्या पार्श्वभूमीवर रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे महापालिका
आणि नगरपालिका क्षेत्रांतील पथ विक्रेत्यांच्या आर्थिक उलाढालीवर विपरित परिणाम झाला होता. अनेक पथ विक्रेत्यांचा व्यवसाय अडचणीत आला होता.
त्यांना काही अंशी शासनाच्यावतीने प्रधानमंत्री दिलासा मिळावा यासाठी आत्मनिर्भर योजनेची घोषणा केली होती. ती योजना आता मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात लागू करण्यात आली असून याठिकाणी असलेल्या पथ विक्रेत्यांना शासनाच्या विविध आठ योजनांचा लाभ मिळणार आहे.
या योजनेतून पथ विक्रेत्यांना केवळ कर्ज न देता इतरही शासनाच्या काही योजनांचा लाभ देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत स्वनिधी से समृध्दी ही संकल्पना गृहीत धरून लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
हा कार्यक्रम राज्यात राबविण्यासाठी चौथ्या ३१ नगरपरिषदाची निवड केली असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेडा नगरपरिषदेचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांकडून देण्यात येणाऱ्या आठ योजनांचा लाभ सांगोला व मंगळवेढा येथील पथविक्रेत्यांना देण्यात येणार आहे.
यामध्ये वित्त विभागाच्यावतीने प्रधानमंत्री जीवनज्योती योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जन-धनयोजना व रूपे कार्ड देण्यात येणार आहे. कामगार विभागाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी करणे व त्यांना लाभ देणे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात येणार आहे.
अन नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने एक राष्ट्र एक रेशनकार्ड ही योजना राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येणार आहे.
0 Comments