डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने नूतन पालकमंत्र्यांचे केले स्वागत
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मंगळवारी प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले होते. दिवसभरात त्यांचे भरगच्च कार्यक्रम झाले. हेरिटेज लॉन याठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती. त्याठिकाणी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत कटारे यांच्या हस्ते पालकमंत्री विखे पाटील यांच्या सोलापुरी चादर, बुके देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी संघटनेचे सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, उपाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, खजिनदार विकास कस्तुरे, कार्यकारिणी सदस्य इम्रान सगरी, अकबर बागवान, मनोज भालेराव, जहुर सय्यद, पत्रकार विशाल भांगे हे उपस्थित होते.
डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने आपणास पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही देण्यात आली.
संघटना ही ज्येष्ठ संपादक राजा माने यांची असल्याचे समजताच ते माझे चांगले मित्र आहेत, आज डिजिटल मीडियाचा जमाना असून तुमच्याशिवाय आमचं काही चालत नाही असे गौरवोद्गार पालकमंत्री यांनी काढले.
हिरेटेज गार्डन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्काराची गर्दी पाहून पुढील कार्यक्रम आणि वेळेची कमतरता पाहून सत्कार टाळले. पण भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी डिजिटल मीडिया संघटनेकडून सत्कार असल्याचे सांगितले. यावर तत्काळ पालकमंत्र्यांनी पुढे होऊन सत्कार स्वीकारला.
0 Comments