google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज सोलापुरात सफाई कर्मचाऱ्यांचा करंट लागून जागीच मृत्यू ; नातेवाईकांचा सिव्हीलमध्ये आक्रोश

Breaking News

ब्रेकिंग न्यूज सोलापुरात सफाई कर्मचाऱ्यांचा करंट लागून जागीच मृत्यू ; नातेवाईकांचा सिव्हीलमध्ये आक्रोश

 ब्रेकिंग न्यूज सोलापुरात सफाई कर्मचाऱ्यांचा करंट लागून जागीच मृत्यू ; नातेवाईकांचा सिव्हीलमध्ये आक्रोश

सोलापूर : सोलापूर शहरातील एका मॉल मध्ये साफसफाईचे काम करताना युवा कर्मचाऱ्याला पाण्यात करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. त्या मृत कर्मचाऱ्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असून ही माहिती मिळताच नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे.

आफ्रिदी अब्दुल शेख वय 24, राहणार सहारा मशिद जवळ, आंबेडकर नगर सोलापूर असे करंट लागून मरण पावलेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे.

बुधवारी पहाटेपासूनच सोलापुरात पाऊस सुरू आहे. संबंधित मॉल हा सात रस्ता परिसरातील नाना नानी पार्क समोर असल्याची माहिती समोर आली आहे. या पावसामुळे मॉलच्या बेसमेंट मध्ये पाणी साठले होते ते पुसण्यासाठी तो कर्मचारी गेला होता

 ते पाणी पुसताना पाण्यात करंट उतरला होता करंट लागून जागेवरच आफ्रिदी शेख या युवकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. मृतदेह सिव्हील हॉस्पिटल मध्ये आणण्यात आला आहे ही माहिती मिळताच नातेवाईकांची गर्दी झाली असून घरातील युवा करता पुरुष गेल्याने प्रचंड आक्रोश सुरू आहे.

Post a Comment

0 Comments