google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे नागरिकांना कळेना..

Breaking News

सांगोला शहरात खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे नागरिकांना कळेना..

 सांगोला शहरात खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे नागरिकांना कळेना..

सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला शहरात सर्वत्र खड्डे पडले असून नागरिकांना रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहे ते काहीच कळेनासे झाले आहे गेली पाच-सहा वर्षात एकी रस्ता शहरांमध्ये डांबरीकरण झाला नाही कामे निष्कृष्ट दर्जाची चालू आहेत नगरपालिकेच्या प्रशासनावर कोणत्याच राजकीय नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा वचक राहिलेला नाही नगरपालिकेचे प्रशासन सर्वांनाच गोल गोल फिरवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

प्रशासनावर कोणाचाच वचक राहिलेला नाही प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरू असून सांगोला शहराच्या वाड्या-वस्त्या वरचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. जे नागरिक राजकीय नेत्यांना व प्रशासनाला भेटतात.

 त्याचीच कामे सुरू आहेत वाड्या-वस्त्या वरील नागरिकांना सध्या तरी न्याय मिळेल असे वाटत नाही. गेली पाच वर्ष नगरपालिकेमध्ये कुठलीच विकास कामे झाले नाही प्रशासक नेमून एक वर्ष झाले तरी शहरांमध्ये कुठल्याही प्रकारची कामे होत नाही.

 सांगोला नगरपालिकेच्या प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे अधिकारी मनमानीपणे काम करीत आहेत नगरपालिकेत कोणीच कोणाचे ऐकत नाही हम करे सो कायद्याप्रमाणे नगरपालिकेत सर्वसामान्यांना सध्यातरी वागणूक मिळत आहे.

रस्ते नाहीत, गटारी नाही, सीडी वर्क नाहित, वाड्या वस्ती व त्यावरील नागरिकांना सध्या चिखलाचा सामना करावा लागत आहे.

 वाड्या-वस्त्यांवर रस्त्यावर मुरूम टाकला जात नाही. राजकीय नेत्यांनी दबाव आणेल त्या पद्धतीने नगरपालिकेत सध्या कामकाज सुरू आहे. प्रचंड प्रमाणात अर्थपूर्ण वाटाघाटी करून गुंठेवारीची प्रकरणे सुरू आहे. बांधकाम परवाना, वापर परवानाला पैशाची मागणी केली जात आहे. रस्त्याची गटारीची व विकासाची कामे निकृष्ट होत असून त्यामध्ये प्रचंड प्रमाणात अर्थपूर्ण वाटाघाटी सध्या होत आहेत.

Post a Comment

0 Comments