आमदार शहाजीबापू पाटील वाढदिवस विशेष लेख संघर्षयोध्दा: ॲड.आमदार शहाजीबापू पाटील.
सांगोला तालुक्याचे राजकारण हे गेली कित्येक वर्षे स्व.गणपतराव देशमुख,आमदारॲड.शहाजीबापू आणि दिपकआबा यांच्या भोवती फिरतयं. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी या तिन्ही नेत्यांचे गट-तट आहेत.परंतु सांगोल्याच्या राजकारणात शहाजीबापूंनी दिलेली लढत आणि त्यांचा संघर्ष यातून शिकण्यासारखे बरच काही आहे.
कॉंग्रेसमध्ये असताना सांगोल्यात १९९५साली बापूंनी १९२मतांनी विजय मिळवला आणि सांगोल्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून १९९५ते १९९९या काळात बापूंनी कायमस्वरूपी दुष्काळी तालुका ही ओळख पुसावी यासाठी त्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या त्यावेळी राज्यात मात्र शिवसेना-भाजपाचे सरकार आले तरीही आपल्या बुध्दीकौशल्यावर विरोधी बाकावर असताना सुध्दा तालुक्यातील अनेक विकासाची कामे खेचून आणली त्यामध्ये
सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी महत्वकांक्षी असलेली टेंभू उपसा जलसिंचन योजना असेल किंवा मागासलेल्या गावांना टॅंकरमुक्त करण्यासाठी शिरभावी ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना हे सगळ बापूंनी स्वकर्तृत्वावर खेचून आणलं यानिमित्ताने बापूंची चुणूक सर्वांनी बघितली आणि त्यावेळी त्यांच्या वक्तृत्वाने, नेतृत्वाने लोकांच्या मनात घर केल होतं.
नेमकी हीच गोष्ट काहीजणांना किंबहुना पक्षातील वरच्या नेत्यांनाच खटकू लागली आणि मग तिथूनच प्रत्येक वेळी बापूंची पीछेहाट कशी होईल यासाठी वरच्या पातळीवरून सतत हालचाली होत गेल्या. त्याचाच भाग म्हणजे पुढे १९९९ च्या निवडणुकीत बापूंना अपक्ष लढाव लागलं आणि बापूंचा त्यावेळी पराभव झाला परंतु त्यावेळी बापूंना पडलेली मते लक्षात घेता सांगोल्यात पक्षापेक्षा बापूंवर प्रेम करणारी जनता आहे हे सिद्ध झालं.
यापुढच्या काळात बापूंचे सतत खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि खरया अर्थाने बापूंच्या राजकीय संघर्षाला सुरूवात झाली. १९९९पासून प्रत्येक वेळी बापूंच्या विरोधात कटकारस्थान रचली जात होती
आणि पराभव बापूंची पाठ सोडत नव्हता.१९९९ते २०१९ इतका मोठा संघर्षाचा काळ आणि त्यात पराभवाचे चटके सहन करून अगदी संकटांनी सगळ्या बाजूंनी घेरलेल असताना राजकारणात टिकून राहिलेले कदाचित बापू हे राज्यातील एकमेव उदाहरण असावं. कारण एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जरी पराभव झाला
तरी माणूस खचतो इथं तर कित्येक वर्षे फक्त पराभव आणि पराभवच वाट्याला येत होता पण तरीही न खचता केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा मुसंडी मारून राजकारणात आपल अढळ स्थान प्राप्त करणारे बापू हे उदाहरण कदाचितच पहायला मिळेल.अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
सर्वच बाजूंनी म्हणजे राजकीय, कौटुंबिक, आर्थिक सगळीच घडी विस्कटलेली असताना तालुक्यातील बापूंच्या पाठीशी असणारे कार्यकर्ते आणि मतदार मात्र त्यांच्या मागे ठामपणे उभा असायचे हे त्यांच्या राजकारणाच वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
२०१४ साली पक्षातल्या अंतर्गत कटकारस्थानांना कंटाळून बापूंनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी त्या परिस्थितीत घेतलेला तो निर्णय योग्य आणि रास्त होता आणि बापूंच्या कार्यकर्त्यांनाही तो मान्यच होता
पण तरीही २०१४साली पुन्हा पराभवाला सामोरे जाव लागलं. यावेळी मात्र या पराभवाने संपूर्णच राजकीय घडी विस्कटली अगदी कुठच काही आशेचा किरण दिसत नव्हता. बापू हे नाव राजकीय पटलावरुन मागे पडत की काय अशीच भिती बापूंवर प्रेम करणारया सर्व कार्यकर्त्यांना वाटू लागली.
आमदार शहाजीबापूंचा राजकीय प्रवास बघितला तर राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करावा लागेल. जीवनामध्ये जर सतत अपयश येत असेल तर या कठीण काळात संयम आणि सहनशीलता कशी असावी यासाठी बापूंचा राजकीय जीवनप्रवास बघावा.
कारण त्यांचा एकूण जीवनप्रवास म्हणजे धाडस, संयम आणि सहनशीलता यांचा सुरेख संगमच म्हणावा लागेल.
१९९० पासून १९९५ते १९९९एवढा काळ सोडला तर त्यापुढील काळात पाठोपाठ येणाऱ्या अपयशापुढे न झुकता त्यातून पुन्हा उठून उभा राहणारे आणि आपल स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे आमदार शहाजीबापू पाटील हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरणं असावं.आजच्या घडीला सगळं काय OKजरी दिसत असल तरी त्याOK मागचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे.
आपल्या मातीशी, आपल्या सर्वसामान्य जनतेशी आपुलकी, निष्ठा जपणारे शहाजीबापू आजच्या सुशिक्षित तरुणांसाठी एक प्रेरणादायी ऊर्जास्रोत आहेत.
२०१४ ते २०१६बापूंच्या राजकारणातील अत्यंत संघर्षाचा काळ पण परिस्थितीपुढे न झुकता त्याला तोंड देत राहायच आणि लढत राहायच.
एखाद्या उजाड माळरानावर सगळीकडे उजाड झालेली धरणी आणि अशा परिस्थितीत एखाद्या रोपट्यांनं तग धरून आपल अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करावी व मातीतला उरलासुरलेला ओलावा शोषून घेऊन टिकून रहावं आणि नंतर येणाऱ्या पावसात बहरावं अगदी तसच शहाजीबापू कठीण काळातही जनतेच्या प्रेमाच्या ओलाव्यावरती राजकारणात तग धरून राहिले.
अशातच २०१६साली सांगोला नगरपालिकेची निवडणूक लागली त्याही निवडणुकीत पुन्हा बापू एकटेच पण या निवडणुकीत बापूंनी स्वतः ला झोकून दिलं आणि निर्णायक विजय खेचून आणला. या विजयाने बापूंच्या राजकीय संघर्षाला जणू नवसंजीवनी मिळाली अर्थातच संपूर्ण तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सुध्दा ती नवसंजीवनीच होती.
या विजयाने कार्यकर्त्यांना बळ आलं एक वेगळाच उत्साह त्यांच्यामध्ये संचारला तद्नंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही समाधानकारक यश मिळालं. या विजयाने बापूंच्याही राजकीय जीवनात पुन्हा एक आशेचा किरण निर्माण झाला. नव्हे तर हा विजय म्हणजे येणाऱ्या मोठ्या विजयाची नांदीच होती.
अशातच २०१९साल उजाडले आणि पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली पुन्हा बापू त्याच धैर्याने रणांगणात उतरले पण धाडस करणारांना नशीब ही साथ देत अस म्हणतात आणि तसच या निवडणुकीत झालं जिथ आजपर्यंत विधानसभेची निवडणूक आली
की सगळ्या गोष्टी विरोधात जायच्या तिथ २०१९ला सगळी समीकरण जुळून आली. सगळ्या गोष्टी बापूंच्या बाजूने घडत गेल्या, कित्येक वर्षाचा संघर्ष संपला आणि पुन्हा एकदा आमदारकीची माळ बापूंच्या गळ्यात पडली. हा विजय गेली कित्येक वर्षे बापूंबरोबर ठामपणे उभारणारया जनतेचा होता.हा विजय संयम आणि संघर्षाचा होता.
२०१९पासून आजपर्यंत बापू तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. दुष्काळी तालुका ही सांगोल्याची ओळख पुसून टाकण्यात बापूंना मिळालेल यश हे निश्चितच अभिमानास्पद आहे. विकास म्हणजे पायाभूत सुविधा सर्वांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचणं.
या गोष्टींची जाणीव असल्यामुळे बापूंनी आज सांगोला शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात तिथल्या वाड्या वस्त्यांवर चांगले रस्ते, वीज, पाणी या सगळ्या गोष्टी पोहचवल्या आहेत तसेच येणाऱ्या काळात त्या राहिलेल्या सगळ्या भागात पोहचतील.
गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सत्तानाट्य घडलं आणि काय झाडी, काय डोंगर, काय हाटील या वाक्याने बापूंची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही पोहचली.हे वाक्य सहज बोलणं आणि त्याला अमाप प्रसिध्दी मिळणं हा योगायोग जरी असला तरी त्यामुळे कित्येक वर्षे भोगलेला संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राला यानिमित्ताने समजला.
आज प्रसिध्दीच्या शिखरावर असताना सुध्दा आपला साधेपणा त्यांनी सोडलेला नाही. कार्यकर्त्यांसोबत बसणं,त्यांच्या अडचणी सोडविणं यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ते सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी उपलब्ध असतात.
बापूंचा हा आतापर्यंतचा प्रवास एक प्रेरणा देणारा आहे. आयुष्य जगायला शिकवणारा आहे. संयम, धाडस आणि जिद्द असेल तर आपण आयुष्यात कितीही संकट आली तरी त्यातून मार्ग काढू शकतो. अपयश आल्यानंतर आयुष्यात जिथं सगळं संपलय अस वाटेल अशा वेळी बापूंचा जीवनप्रवास निश्चितच प्रेरणा देईल.
एकंदरीत काय तर कितीही गटतट निर्माण झाले आणि काहीही झालं तरी सांगोल्यात त्यांच्यावर प्रेम करणारांसाठी 'बापू' हाच पक्ष आहे हे मात्र नक्की!
बापूंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!
त्यांची अशीच भरभराट होत राहो.
त्यांच्याकडून तालुक्याचा सर्वांगीण विकास होवो व त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!!
*राहुल घोंगडे.*
(9767003789)


0 Comments