google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अबब' चक्क बहादराने घराच्या अंगणात लावली गांजाची तब्बल १३ फूट उंच वाढलेली गांजाची १५ झाडे

Breaking News

अबब' चक्क बहादराने घराच्या अंगणात लावली गांजाची तब्बल १३ फूट उंच वाढलेली गांजाची १५ झाडे

अबब' चक्क बहादराने घराच्या अंगणात लावली गांजाची तब्बल १३ फूट उंच वाढलेली गांजाची १५ झाडे 

 अकोला:- पट्ठ्याने घराच्या अंगणातच गांजाची झाडे लावली आणि गांजाची मस्त मोठी बाग फुलवली परंतु पोलिसांनी छापा टाकल्यावर मात्र त्याची पळता भुई थोडी झाली !

अलीकडे गांजाची लागवड मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. शेतात ऊसाच्या पिकात, कांद्याच्या पिकात गांजाची लागवड केली जात असल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. गांजा लागवड, वाहतूक, विक्री तसेच तो बाळगण्यास देखील कायद्याने बंदी आहे परंतु कायदा झुगारून देत अनेक शेतकरी आपल्या शेतात गांजाची लागवड करतात. 

गांजाची झाले पक्व झाली की त्याचा वास दूरपर्यंत जातो, शिवाय शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना याची भनक लागते आणि एक दिवस पोलीस थेट शेतात दाखल होतात. गांजा तर जप्त केला जातोच पण संबंधितांवर गुन्हा देखील दाखल होत असतो. हे माहित असूनही असे धाडस केले जाते. अकोल्याच्या पातूर येथील भीमनगरात तर बहाद्दराने थेट घराच्या अंगणातच गांजाची झाडे फुलवली आहेत. 

एका व्यक्तीने आपल्या घराच्या मागील अंगणात गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांच्या कानावर गेली आणि पोलीस थेट त्याच्या घरी दाखल झाले. कय्युम शेख याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या अंगणात गांजाची तब्बल १३ फूट उंच वाढलेली गांजाची १५ झाडे पोलिसांना आढळून आली. 

घराच्या अंगणात गांजाची झाडे लावण्याचा प्रकार पाहून पोलिसांचाही भुवया उंचावल्या आणि गावकरीही त्याच्या अजब धाडसाचे आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर येथे गावकरी देखील मोठ्या संख्येने जमले होते आणि  उंच वाढलेल्या गांजाच्या झाडांकडे आश्चर्याने पहात राहिले. गांजाची झाडे लावून ती वाढविण्यात आली होती. 

घराच्या अंगणात लोक कौतुकाने बगीचा फुलवतात, फळझाडे लावतात आणि त्याची निगा राखतात. या पट्ठ्याने चक्क गांजाची झाडे लावून त्याची निगा राखली होती. घराच्या अंगणात गांजाची झाडे लावण्याचा हा प्रकार सर्वानाच दुर्मिळ वाटला आहे.

 शेतात पिकात लपवून तरी हा उद्योग केला जातो पण या बहाद्दराने चक्क घराच्या परिसरात हे धाडस केले होते. अंगणात हिरवीगार फुललेली तेरा फूट उंचीची गांजाची १५ झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत आणि कय्युम शेख यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. कय्युम शेख हा गांजाची झाडे लावून त्याचे संगोपन करीत होता आणि झाडांची पाने वाळवून त्याची छुपेपणाने विक्री देखील करीत होता. 

पोलिसांनी पातूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम २० ब नुसार आरोपी कय्युम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही लोक चोरट्या मार्गाने गांजाची झाडे लाऊन अवैध मार्गाने त्याची विक्री करतात. पोलिसांच्या कानापर्यंत माहिती जात नाही तोपर्यंत हे अवैध व्यवसाय सुरूच असतो आणि जादा पैसे मिळत असल्याने अनेकजण याकडे वळतात. 

जेंव्हा पोलिसांच्या कानावर याची माहिती जाते तेंव्हा मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागते. यातील एका झाडांची किंमत एक लाख पाच रुपये असून पोलिसांनी ही झाडे उपटून ताब्यात घेतली आहेत.  काही दिवसांपूर्वी शेतातील नोकराने गांजाचे झाड लावलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी शेतकरी आणि नोकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments