google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता !

Breaking News

देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता !

 देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता !

सोलापूर : शिंदे - फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडेच सोलापूर जिल्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी जाण्याची अधिक शक्यता व्यक्त होत आहे. 


शिंदे- फडणवीस यांच्या नव्या सरकारचा काल विस्तार झाला असून शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण अठरा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. खातेवाटप होऊन संबंधित मंत्री आपापल्या खात्याच कारभार पाहण्यास लगेचच सुरुवात होणार आहे. विस्ताराबाबत दोन्ही गोटात अंतर्गत नाराजी असल्याचे स्पष्ट झाले असून एकेका जिल्ह्याला दोन आणि तीनही मंत्रीपदे दिली गेली आहेत पण २१ जिल्हे हे मंत्रीपदाविनाच आहेत. त्यात सोलापूर जिल्हा देखील असून शिंदे गटाने सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना बाजूला ठेवले आहे तर भारतीय जनता पक्षाने देखील सोलापूर जिल्ह्यात एकही मंत्रीपद दिले नाही. सोलापूरला गाजर दाखविल्याने याबाबत कालपासूनच चर्चा सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही देशमुख यांना पहिल्या विस्तारात तरी संधी दिली नाही त्यामुळे जिल्ह्यात नाराजी असणे स्वाभाविक आहे. 


भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीशी सामना करावा लागणार आहे. शिंदे गटाला तर 'गद्दार' असा बसलेला शिक्का पुसणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. भविष्यातील विभागावर राजकीय परिस्थिती पहिली तर राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या भागात भाजपचे पालकमंत्री असण्याची शक्यता आहे. त्यातच पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातील काही आमदार आणि महाविकास आघाडीतील काही नेते भारतीय जनता पक्षात डेरेदाखल होण्यास उत्सुक असल्याचे दिसते. आमदारकी वाचाविण्यासाठी आमदार आत्ताच भाजप प्रवेश करणार नाहीत परंतु ते मनाने भाजपात आहेत. काही नेते मात्र भाजपात जाण्यास सज्ज आहेत. आणि हा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून सहजशक्य आहे. त्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी फडणवीस घेवू शकतात अशी राजकीय परिस्थिती आहे.  


नव्या सरकारच्या पहिल्या विस्तारात सोलापूर जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालेले नाही. त्यातच सोलापूरजिल्ह्याला पालकमंत्री म्हणून कोण मिळणार याचीही उत्सुकता आहे. याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. सोलापूर जिल्ह्याला शिंदे गटाकडून पालकमंत्री दिला जाणार नाही असेही सांगितले जात आहे.विदर्भ, मराठवाडा परिसारत शिवसेनेची शक्ती मोठी आहे त्यामुळे शिंदे गटाचे पालकमंत्री औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, उस्मानाबाद या मतदार संघात दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकीकडे भाजपचे अधिक लक्ष असून पुढील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी अपक्ष आमदार आणि शिंदे गटातील आमदार यांना भरघोस निधी देण्याची तयारी देखील सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अपक्ष आमदार आणि शिंदे गटातील आमदार या सर्वांनाच मंत्रीपडे देणे शक्य नाही त्यामुळे भरघोस विकास निधी देवून वाढू लागलेली नाराजीही दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे.


शिंदे गटाकडे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे गेलेले आहेत तर सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार अक्कलकोट, माळशिरस, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, बार्शी, पंढरपूर- मंगळवेढा या मतदार संघात आहेत. त्यात बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत आणि शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख हे त्यांच्या मतदार संघातून अनेकदा विजयी झालेले आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपकडून विधानपरिषदेत पोहोचले आहेत पण भाजपाकडून जुन्याच आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्याआधी सोलापूर जिल्ह्यासाठी पालक मंत्री पदाची जबाबदारी कुणावर सोपवली जातेय याची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली आहे. 


सोलापूर जिल्हा हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेला जिल्हा असून या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे वादळ उठले आहे. बबनदादा हे 'नो कॉमेंट्स' म्हणत आहेत. त्यांनी आत्ताच पक्षांतर  तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते परंतु राजन पाटील,  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह  अन्य काही नेते भाजपच्या वाटेवर पोहोचले आहेत. अशा अनेक नेत्यांना भाजपात आणून जिल्ह्यात भाजपाची ताकद आणखी वाढविण्याचा प्रयत्न होणार आहे आणि यासाठी देवेंद्रफडणवीस हेच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे . स्वातंत्र्यदिन पाच दिवसावर येऊन ठेपला असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून  कुणाच्या हस्ते झेंडावंदन होतेय हे येत्या काही  दिवसातच स्पष्ट होईल.

Post a Comment

0 Comments