म्हैसाळ योजनेचा कार्यकारी अभियंता लाच घेताना अटकेत
लाच स्वीकारणे हा प्रशासनाला लागलेला महाभयंकर रोग आहे. सांगोला तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाची तहान भागवण्यासाठी महत्प्रयासाने सुरू झालेल्या ताकारी म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागालाही या लाचखोरीची खूप दिवसांपासून लागण झाली होती. त्याचा थरारक शेवट आज एका कार्यकारी अभियंत्याच्या अटकेने झाला.
एक लाखांची लाच घेताना ताकारी म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आणि एक खासगी बांधकाम व्यावसायिक यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. टेंडर देण्यासाठी 4 टक्क्यांनी लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
सांगलीमधील वारणाली वसाहतमधील अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्तीकरिता स्वीपर देण्याच्या टेंडरची ऑर्डर देण्यासाठी चार टक्क्यांनी 1 लाखांची लाच मागितली होती.
कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि खासगी बांधकाम व्यवसायिक राहुल कणेगावकर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीला धमकावले
कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीला धमकावण्यात आल्याचीही घटना यावेळी घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित बाळासाहेब होनमोरे, अभिजित हारगे, तानाजी रुईकर, उमेश मिरजे आदींच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी रुईकर आणि उमेश मिरजे अशी अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या अन्य दोन जणांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद इंद्रजित अशोक घाटे यांनी शहर पोलिसात दिली आहे. बाळासाहेब होनमोरे, अभिजित हारगे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून यातील बाळासाहेब होनमोरे हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक देखील आहेत.
सांगलीमधील वारणाली वसाहतमधील अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्तीकरिता स्वीपर देण्याच्या टेंडरची ऑर्डर देण्यासाठी चार टक्क्यांनी 1 लाखांची लाच मागितली होती.बाळासाहेब होनमोरे आणि अभिजित हारगे यांनी तक्रार मागे घे म्हणत होते, त्याचबरोबर तानाजी रुईकर आणि अशोक घाटे यांनी चल उठ बाहेर चल, आम्हाला तुझ्यासोबत बोलायचे आहे. बाहेर नाही आलास तर तुला बघून घेईन अशी धमकी दिल्याचे घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिसांनी चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
नलवडे सतत वादग्रस्त
म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांचे काम सतत वादग्रस्त राहिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. म्हैसाळ योजनेच्या सांगोला तालुक्यातील लाभार्थ्यांना नलवडे यांच्याकडून दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत होता. त्यांच्या कामकाजावर या भागातील शेकडो शेतकरी नाराज होते.


0 Comments