google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आयुष भारत संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ आॅगस्टला उपोषण लेखी स्वरुपात उत्तर द्या अन्यथा उपोषण सोडणार नाही : डॉ.विश्वास वाघमारे

Breaking News

आयुष भारत संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ आॅगस्टला उपोषण लेखी स्वरुपात उत्तर द्या अन्यथा उपोषण सोडणार नाही : डॉ.विश्वास वाघमारे

 आयुष भारत संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ आॅगस्टला उपोषण लेखी स्वरुपात उत्तर द्या अन्यथा उपोषण सोडणार नाही : डॉ.विश्वास वाघमारे

सोलापूर प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करित असणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून बोगस वैद्यकीय व्यावसायिक म्हणून चुकीची कारवाई न होण्याबाबत तसेच मा. उच्च न्यायालय मुंबई, मा.औरंगाबाद हायकोर्ट, मा. बार्शी न्यायालय, मा. मंगळवेढा न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांचा अवमान होऊ नये म्हणून दिनांक १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयुष भारत संघटनेच्या वतीने जाहीर उपोषण करण्यात येणार आहे. 


आम्ही आयुष भारत डॉक्टर संघटनेच्या वतीने  आज रोजी जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ही निवेदन देण्यात आली आहेत. सध्या मंगळवेढा तालुक्यात व इतर ठिकाणी बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई होणेकामी जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत परंतु जिल्हा प्रशासनाने केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाकडे तसेच मा.हायकोर्ट मुंबई, मा.औरगाबांद खंडपीठ, मा.मंगळवेढा न्यायालय, मा.बार्शी न्यायालय यांच्या निकालपत्रांकडे डोळेझाक करून आदेश पारीत केलेले आहेत


 परंतु पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करणाऱ्या नॅचरोपॅथी, इलेक्ट्रोपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, CMS & Ed व इतर पॅथी यांच्यावर वैद्यकीय व्यवसायिकांवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करू नये असे आदेश केंद्र शासन, राज्य शासन उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, जिल्हा तालुका न्यायालय अशा विविध न्यायालयाच्या आदेशावरून सिद्ध झालेले आहे तरी सदर वैद्यकीय व्यवसायिकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्यास सदरची कारवाई मा. हायकोर्ट मुंबई, मा. औरंगाबाद खंडपीठ.मा बार्शी न्यायालय, मा. मंगळवेढा न्यायालय. मा. सर्वोच्च न्यायालय  यांचा अवमान ठरेल व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालय अवमान प्रकरणी ची कारवाई होऊ शकते. 


तरी जिल्हा प्रशासनाने केंद्र शासन, राज्य शासन मा.उच्च न्यायालय, मा औरंगाबाद खंडपीठ, मा मंगळवेढा न्यायालय, मा. बार्शी न्यायालय, मा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन करून व सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांविरुद्ध कारवाई करू नये व पाच दिवसांमध्ये आम्हाला लेखी स्वरुपात  उत्तर द्यावे अन्यथा १५ आॅगस्ट पासून आयुष भारतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर उपोषण करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना डॉ.अमीर मुलाणी आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विश्वास वाघमारे, डॉ.अंनद भोसले यांनी दिले.

Post a Comment

0 Comments