google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुःखद !सोलापूर जिल्ह्यातील घटना.. तीन वर्षाच्या लेकीसह आईची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News

दुःखद !सोलापूर जिल्ह्यातील घटना.. तीन वर्षाच्या लेकीसह आईची गळफास घेऊन आत्महत्या

 दुःखद ! सोलापूर जिल्ह्यातील घटना.. तीन वर्षाच्या लेकीसह आईची गळफास घेऊन आत्महत्या 

सोलापुर :- मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे तीन वर्षाच्या मुलीसह स्वतः गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केल्याची मन हेलावून सोडणारी घटना सोमवारी 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान कोरवली येथे घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. प्रीती विजयकुमार माळगोंडे वय. 25  तर आरोही विजयकुमार माळगोंडे वय 3 वर्ष  असे मयत माय लेकींचं नाव आहे.


पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रीतीचे पाच वर्षांपूर्वी कोरवली येथील विजयकुमार माळगोंडे यांच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर प्रीती व विजयकुमार हे दापत्य त्यांच्या शेतातील घरात राहत होते. त्यांना मुलगी आरोही (मयत) व मुलगा बसवराज असे दोन मुले होती.


त्यांचा सुखाचा संसार चाललेला असताना दीड वर्षापासून त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. पती विजयकुमार हा पत्नी प्रीतीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण व शिवीगाळ करीत होता. दरम्यान या दांपत्याने सोमवारी  सकाळी दहा वाजता गावातील महादेव मंदिरात येऊन अभिषेक घालून गेले होते. सोमवारी दुपारी तू मल्लिनाथ राहणार हत्तुर ता. दक्षिण सोलापूर मयताचा भाऊ याला का फोन केला म्हणून तिला चाबकाने व चपलाने मारहाण करून धमकी दिली होती. धमकी देऊन तो जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी शेतात गेला होता.


तिने सततच्या त्रासाला कंटाळून मुलगी आरोही वय 3 वर्ष व मुलगा बसवराज वय दीड वर्ष यांना राहते घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास देऊन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मुलगा बसवराज याला गळफास व्यवस्थित न बसल्याने मुलगा बसवराज याचा जीव वाचला आहे.


मयताचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरूळे राहणार हत्तुर ता. दक्षिण सोलापूर यांनी मयताचा पती विजयकुमार हा माझे बहिणीस सतत शिवीगाळ मारहाण दमदाटी करीत होता. त्यामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे. अशा प्रकारची फिर्याद विजयकुमार माळगोंडे यांच्यावर दाखल केली आहे. तर मयताचे पतीने विजयकुमार माळगोंडे यांनी माझी मुलगी आरोही हीला गळफास लावून तिला जीवे मारून स्वतःही साडीने गळफास घेऊन पत्नी मयत झाली आहे. म्हणून मयत पत्नी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments