google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगली: सावकाराच्या त्रासाला कंटाळून सलून व्यावसायिकाची आत्महत्या!

Breaking News

सांगली: सावकाराच्या त्रासाला कंटाळून सलून व्यावसायिकाची आत्महत्या!

 सांगली: सावकाराच्या त्रासाला कंटाळून सलून व्यावसायिकाची आत्महत्या!

सांगली: कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्दमधील खासगी सावकाराच्या धमक्यांना कंटाळून एका सलून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनोज सीताराम शिंदे (वय ४०) असे या सलून व्यावसायिकाचे नाव आहे.


फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार,  प्रदीप यादव याने जानेवारी २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत मनोज शिंदे यांना सलून व्यवसायासाठी ३० हजार रुपये व्याजाने दिले होते. त्या पैशाचे व्याजापोटी मनोज शिंदे यांनी ९० हजार रुपये परत दिले होते. तरीही प्रदीप यादव याने मनोज शिंदे व त्यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. 


तसेच प्रदीप याने 'तू माझे कसलेही पैसे दिले नाहीस, तु पैसे दिले नाहीस, तर मी तुला सुखाने जगू देणार नाही', अशी धमकी दिली. प्रदीप यादव हा वारंवार शिंदे यांना शिवीगाळ करून धमकी देऊन मानसिक त्रास देत होता. या मानसिक त्रासातून मनोज यांनी ३१ जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घराच्या बाजूच्या शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.


दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी, खासगी सावकार प्रदीप किसन यादव (वय ३३, रा. कडेपूर, ता. कडेगाव) याच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments