मोदी सरकार करणार ‘या’ योजनेची घोषणा, सामान्यांचा काय फायदा होणार..?
देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांसाठी मोठ्या आरोग्य योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.. या योजनेचा प्रत्येक नागरिकाला सहज लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले.. ‘प्रधानमंत्री समग्र स्वास्थ्य योजना’ असं या योजनेचं नाव आहे.. प्रत्येक नागरिकाला एकसमान, परवडणारी व दर्जेदार आरोग्यसेवा सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी ही याेजना राबवली जाणार आहे.. ही योजना म्हणजे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे पुनब्रॅंडिंग किंवा अॅडव्हान्स व्हर्जन असल्याचे समजते..
समग्र स्वास्थ आरोग्य योजना ही सर्वसमावेशक असलेली सर्वात मोठी आरोग्य योजना असेल. पीएम जन आरोग्य योजना (PM-JAY), आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) व पीएम आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM-ABHIM) अशा योजनांचा या पीएम समग्र स्वास्थ आरोग्य योजनेत समावेश केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पीएम समग्र स्वास्थ आरोग्य योजनेशिवाय पंतप्रधान मोदी आणखी दोन योजना सुरु करणार असल्याचे समजते. देशातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देणे, तसेच देशातील वैद्यकीय व्यावसायिकांसाठी परदेशात उपचारांची दारे खुली करण्यासाठी या दोन नव्या योजनांची घोषणा केली जाणार आहे.. ‘हील बाय इंडिया’ व ‘हिल इन इंडिया’ अशी त्यांची नावे आहेत..
‘हील इन इंडिया’ योजनेबाबत…
भारतात परदेशातून उपचारासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी ‘हील इन इंडिया’ योजना राबवली जाणार आहे. या योजनेमुळे परदेशी रुग्णांना देशाच्या कोणत्याही भागात उपचारासाठी रुग्णालयांमध्ये पॅकेज दर, सुविधा आणि उपचाराचा प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल..
‘हील बाय इंडिया’..
भारतीय डॉक्टर व वैद्यकीय व्यावसायिकांना शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाता यावे, यासाठी ‘हील बाय इंडिया’ योजनेंतर्गत सुविधा दिली जाईल.. ‘नॅशनल हेल्थ अथॉरिटी’चे ‘हेल्थ प्रोफेशनल अथॉरिटी’ आणि‘हॉस्पिटल फॅसिलिटी रजिस्ट्री’ त्यासाठी एक व्यासपीठ तयार करणार असल्याचे सांगण्यात आले..


0 Comments