google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला :रस्ते झाले मोठे पण झाडांविना पोरके उन्हाळ्यात सावलीविना प्रवाशांचे हाल ; महामार्गावरील गावांची ओळख पुसू लागली

Breaking News

सांगोला :रस्ते झाले मोठे पण झाडांविना पोरके उन्हाळ्यात सावलीविना प्रवाशांचे हाल ; महामार्गावरील गावांची ओळख पुसू लागली

 सांगोला :रस्ते झाले मोठे पण झाडांविना पोरके

उन्हाळ्यात सावलीविना प्रवाशांचे हाल ; महामार्गावरील गावांची ओळख पुसू लागली


सांगोला , ता . ६ दळगवळण सुविधांसाठी नवे रस्ते निर्माण होणे महत्त्वाचे आहे . मोठे रस्ते बनले , परंतु हे रस्ते निर्माण करण्यासाठी अनेक वर्षाच्या जुन्या झाडांची तोड मोठ्या प्रमाणावर झाली . त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांची कतल झाल्याने हेच महामार्ग सध्या झाडांविना पोरके झाले आहेत . रस्त्याजवळील सावलीच हरवल्याने प्रवाशांचेही ऐन उन्हाळ्यात हाल होत आहेत . 


अनेक भागातील रस्त्यांची वरस्त्यावरील एखाद्या ठिकाणाची तेथे असणाऱ्या झाडांच्या संख्येमुळे व सावलीमुळे एकप्रकारची वेगळी ओळख निर्माण झाली होती . लांबच्या सानिमालेले प्रवासी किंवा कुटुंबीय रस्त्यावरील मोठ्या झाडाची दाट सावली पाहून विश्रांतीसाठी जेवण करण्यासाठी एकत्रित बसत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी रा पहावयास मिळत होते . अनेक वर्षांचे असणारे मोठे वृक्ष या रस्त्याची एक वेगळी ओळख निर्माण करत होते .


 अनेक प्रवासी वाहधारक अशा विश्रांतीसाठी थांबत असत . तसेच लांब पल्ल्याच्या मालवाहू वाहनांमधील वाहनचालक अशाझाडांच्या सावलीत स्वयं असत . परंतु सध्या सर्वत्र रस्त्यांचे आधुनिकीकरण आणि रुंदीकरण होऊ लागले आहे . सोलापूर जिल्ह्यामध्ये व विशेषत : पंढरपूर तीर्थक्षेत्राला जोडणारे सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहेत . तर काहीची कामे सुरू आहेत . 


या रस्ते रंदीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून आपली ओळख निर्माण करणाऱ्या जुन्या वृक्षांची मात्र कत्तल झाली आहे . सिमेंटची आधुनिक रस्ते निर्माण होऊ लागले , मात्र जुन्या रस्त्यांकडेला असगारे झाडे मात्र तोडली गेल्याने रस्ते पोरणी दिसू लागली आहेत . मोठी , जुनी झाडे तोडल्याने त्याठिकाणची ओळसून गेली आहे .

Post a Comment

0 Comments