पती-पत्नीच्या भांडणातून सहा मुलांची हत्या : या दुर्देवी घटनेत सहाही मुलांचा दुर्दैवी मृत्यू
महाड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दुर्देवी घटना घडली असून पती पत्नीच्या भांडणातून एका महिलेने ६ मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेत सहाही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे.
मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला चिखुरी साहनी हा पत्नी आणि सहा मुलांसोबत महाड तालुक्यातील शेलटोली येथे राहत होता. चिखुरी हा बिगारी काम करायचा. पत्नी रुणा ही गृहिणी होती. सोमवारी सकाळच्या सुमारास काही कारणामुळे या दोघांचे भांडण झाले. आणि याच रागाच्या भरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या महिलेने तिच्या सहाही मुलांना बोरगावजवळील एका शेतातील विहिरीत फेकून दिले. यामध्ये रोशनी (10 वर्षे), करिष्मा (8 वर्षे) , रेश्मा (5 वर्षे) , विद्या (4 वर्षे) , शिवराज (3 वर्षे), राधा (3.5 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास या दोघांचे भांडण झाले. आणि याच रागाच्या भरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या महिलेने तिच्या सहाही मुलांना बोरगावजवळील एका शेतातील विहिरीत फेकून दिले. त्यानंतर महिलेने रात्री आठ वाजताच्या सुमारास महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात घटनेची कबुली दिली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानंतर अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि पत्नी यांना ताब्यात घेतले आहे.


0 Comments