google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रवादीमध्ये तयार झाले दोन मतप्रवाह; निवडणुकांवर परिणाम होणार?

Breaking News

राष्ट्रवादीमध्ये तयार झाले दोन मतप्रवाह; निवडणुकांवर परिणाम होणार?

 राष्ट्रवादीमध्ये तयार झाले दोन मतप्रवाह; निवडणुकांवर परिणाम होणार?

महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी- काँग्रेस-शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. परंतु या निवडणुकांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह तयार झाले आहेत.याबात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माहिती दिली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याचा खुलासा केला.


ते म्हणाले की, येऊ घातलेल्या निवडणुकांबाबत आमच्या पक्षात दोन मतप्रवाह झाले आहेत. काहींना असं वाटतंय की निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे आता पक्षात सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. या चर्चेअंतीच निर्णय घेतला जाईल असंही पवार म्हणाले. त्यामुळे आता या मतप्रवाहाचा येत्या निवडणुकांवर अन राजकारणावर काही परिणाम होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


दरम्यान त्यांनी निवडणुकांबाबत सांगताना म्हणाले की, कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असे आदेश दिलेले नाहीत तर निवडणूक तयारीची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू करा असं सांगितलंय असे ते म्हणाले. दरम्यान त्यांना यावेळी मोदींना सक्षम पर्याय देण्यात विरोधी पक्ष अयशस्वी ठरतोय का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधी पक्षांमधील अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवलं.

“मोदींना सक्षम पर्याय देण्यासंदर्भात काँग्रेससह सर्व पक्षांनी याचा अंतर्गत निर्णय घेणं महत्वाचं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments