झेडपी कर्मचारी बदल्यांचे बिगूल वाजले; समुपदेशनाद्वारे होणार बदल्या
सोलापूर / उत्तम बागल : सोलापूर झेडपी कर्मचारी बदल्यांचे बिगुल वाजले. ९ ते १२ मेपर्यंत समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात येणार आहेत. झेडपी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या ९ ते ११ मे दरम्यान तर पंचायत समिती स्तरावर १२ मे रोजी बदल्या करण्यात येणार आहेत. सर्व विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांना सामान्य प्रशासनाकडून बदली संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रशासकीय, विनंती आपसी बदल्या पार पडणार आहेत. पहिल्या सत्रात सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर, वाहनचालक या पदांच्या बदल्या होणार आहेत.
दुसऱ्या टप्यात ग्रामपंचायात विभागातील विस्तारधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तिसऱ्या टप्यात महिला व बाल कल्याण विभागातील सहाय्यक बालविकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, चौथ्या टप्यात प्राथमिक शिक्षण विभागातील विस्ताराधिकारी, केंद्रप्रमूख, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य विभाग आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अर्थ विभाग सहा. लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहा. (लेखा) कनिष्ठ सहा. (लेखा), कृषि विभाग
कृषि विस्तार अधिकारी, कृषीधिकारी, पशुसंवर्धन सहा. पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक,बांधकाम लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,कनिष्ठ अभियंता स्था.अ. सहा.क.आरेखक अशा स्वरूपाच्या बदल्या प्रक्रिया पार पडणार आहेत. तर १२ मे रोजी पंचायात समिती स्तरावर बदली प्रक्रीया पार पडणार आहे. सीईओ दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत बदल्या होणार आहेत


0 Comments