google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक |अवघ्या १३० रुपयांसाठी गुप्तांग पिळून तरुणाचा खून |

Breaking News

धक्कादायक |अवघ्या १३० रुपयांसाठी गुप्तांग पिळून तरुणाचा खून |

 धक्कादायक |अवघ्या १३० रुपयांसाठी गुप्तांग पिळून तरुणाचा खून | 

पैशासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा काही नेम नाही . उधारीच्या अवघ्या १३० रूपयांवरून २८ वर्षीय तरूणाचा गुप्तांग पिळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडीच आली आहे. ही घटना रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे घडली.या प्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


अधिक माहिती अशी की, ऐनपूर येथे रात्री भीमसिंग जगदीश पवार ( वय २८) या तरूणाचा खून झाला. वैयक्तीक वादातून हा भयंकर प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ऐनपूर येथे आरोपी पन्नालाल कोरकू याची टपरी असून त्याचे उधारीचे १३० रुपये भीमसिंग पवार याच्याकडे बाकी होते. काल रात्री उधारीच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यात पन्नालाल कोरकू (वय ५५) याने भीमसिंग पवार याचे गुप्तांग पिरगळून टाकले. भीमसिंगला तत्काळ रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. यामुळे अवघ्या १३० रूपयांसाठी भीमसिंगचा जीव गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागीय पोलिस अधिकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर या प्रकरणातील प्रमुख आरोपी पन्नालाल कोरकू फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments