google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग : मास्क वापराबाबत रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय..!

Breaking News

ब्रेकिंग : मास्क वापराबाबत रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय..!

 ब्रेकिंग : मास्क वापराबाबत रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय..!

देशातून कोरोनाची तिसरी लाट ओसरली नि सगळे व्यवहार पूर्वपदावर आले.. महाराष्ट्रासह काही राज्यांनी तर मास्क सक्तीही हटवण्याचा निर्णय घेतला.. मात्र, धोका अजून संपलेला नाही.. देशावर कोरोनाचे सावट अद्यापही कायम असल्याचं गेल्या काही दिवसांतल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.


भारतात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी फारच सौम्य लक्षणं रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. त्यामुळे रुग्णालयात पेशंट दाखल होण्याचे प्रमाणही फारच नगण्य आहे. असं असलं तरी बेसावध राहून चालणार नाही.


रेल्वेचा मोठा निर्णय

कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे, रेल्वे प्रवासादरम्यान नागरिकांना पुन्हा एकदा मास्क  वापरणे बंधनकारक केले आहे. शिवाय कोविड नियमांचेही पालन करावे लागणार आहे. रेल्वेचे कार्यकारी संचालक (पॅसेंजर मार्केटिंग) नीरज शर्मा यांनी तसे पत्र जारी केले आहे.


नीरज शर्मा यांच्या पत्रानुसार, आता रेल्वे प्रवाशांच्या तोंडाला मास्क असेल, तरच रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय ट्रेनमधून प्रवास करतानाही, प्रत्येकाने मास्क घालणं अनिवार्य असणार आहे. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना कोविड नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत..


रेल्वे प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठीही मास्क घालणे अनिवार्य केले आहे. तसेच याबाबत रेल्वेतर्फे जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे. मास्कशिवाय कोणी प्रवास करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले..


कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने इतर गोष्टींबरोबरच रेल्वेची सेवादेखील पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वेतर्फे अनेक निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. मास्कसक्ती नसल्याने रेल्वे प्रवासादरम्यान अनेक जण मास्कही घालताना दिसत नाहीत. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांसाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

Post a Comment

0 Comments