विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
विज्ञान सांगोला येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा .अशोक वाकडे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा किसन पवार उपस्थित प्रा. मनोहर वाघमोडे प्रा. अशोक कांबळे. यांच्या स्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या उत्तम प्रशासक, उत्तम न्याय प्रविष्ट व मुत्सदी कशा राजकारणी होत्या त्यामुळे त्यांच्या काळामध्ये सर्व धर्म समानतेची वागणूक व न्याय मिळत होता. विविध मंदिरांची प्रतिष्ठापना करून व त्यांचा जीर्णोद्धार करून सर्वधर्म समानतेची शिकवण जनतेला देण्याचे महान कार्य राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले. असे विधान प्रमुख पाहुणे अशोक वाकडे यांनी केले पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अहमदनगर मधील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यातील चौंडी गावात यांचा जन्म झाला. स्त्री शिक्षणाचा फारसा वारसा त्यांना लाभला नाही .
परंतु स्त्री शिक्षणाचा विचार पुढे निघायचे महान कार्य त्यांनी केले मल्हारराव होळकर यांच्या सून म्हणून त्यांनी होळकर घराण्याचा वारसा पुढे चालू ठेवला. अहिल्याबाईंनी मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार पाहिला. त्या स्वतः लढाईत सैन्याचे नेतृत्व करीत राहिल्या . राणी अहिल्यादेवी यांनी जात धर्म प्रांत न पाहता भारतभर अनेक हिंदू मंदिरे बांधली. अहिल्यादेवी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या अनेक विधवांना पतींची मिळकत त्यांच्या जवळ ठेवण्यास मदत केली. राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ येऊ शकत.
असेल याच राजमातेच्या नावानं आज त्यांच्या स्मरणार्थ इंदूर येथील विश्वविद्यालयात त्यांचे नाव दिले .तसेच त्यांच्या नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे एक अस्तित्वात आले. अशा या राजमातेला त्रिवार अभिवादन !महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अशा आदर्शवादी राष्ट्रपुरुष यांची चरित्र जात, धर्म ,पंथ, न पाहता त्याच्या पलीकडे जा'ऊन त्यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे. त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागाचे प्रा. किसन पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की राष्ट्रपुरुष हे जाती-धर्मांमध्ये बंदिस्त करून ठेवण्यासारखे नाहीत. तर त्यांचे विचार हे मानवतेचे व माणूस घडवणारी आहे. तेव्हा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मानवतेचा विचार आला विनम्र अभिवादन कार्यक्रमात बीए भाग तीन मध्ये योगेश देशमुख .तृप्ती कोरे. व विभाग एक मधील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत उत्स्फूर्तपणे व्यक्त केली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियोजित समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे. यांनी केले तर आभार अशोक कांबळे. यांनी मांडले कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने होते.


0 Comments