google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तासगाव ते कोळे एसटी बस पुर्वरत सुरु - आ.अनिल बाबर, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाला यश

Breaking News

तासगाव ते कोळे एसटी बस पुर्वरत सुरु - आ.अनिल बाबर, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाला यश

 तासगाव ते कोळे एसटी बस पुर्वरत सुरु - आ.अनिल बाबर, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाला यश

कोळा (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील कोळा येथे कोरोना एसटी संपामुळे गेली सोळा महिने बंद असलेली तासगाव आगाराची तासगाव ते कोळे एसटी बस रविवारपासून सुरु झाली आहे एसटी बस सुरू करण्यासाठी प्रयत्न विटा खानापूर चे लोकप्रिय आ अनिल भाऊ बाबर शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या यांच्याकडे सतत पाठपुरावा सेवानिवृत्त अधिकारी नौशाद भाई तांबोळी पत्रकार जगदीश कुलकर्णी उपसरपंच दगडू कोळेकर व कोळा ग्रामपंचायतने केल्याने बंद असलेली एसटी बस सुरू झाल्याने प्रवासी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे या मार्गावरील प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा असे आवाहन करण्यात येत आहे.


तासगाव बसस्थानकातून दररोज सकाळी ९:३० वाजता सुटून सदरची एसटी चिंचणी लोढे सिद्धेवाडी दहिवडी सावळज जरंडी शुक्राचार्य व बानुरगड मार्गे कोळा गावात ११.१५ पोहोचते पंधरा मिनिटाच्या थांब्यानंतर ११: ३० वाजता तासगाव कडे सुटते दुपारी सव्वा एकच्या सुमारास तासगाव एसटी स्टँड बस पोहोचते या कोळा ग्रामस्थांच्यावतीने तासगाव एसटी आगाराचे आभार मानण्यात आले आहे या मार्गावरील व भागातील जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करून एसटी बसला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments