google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजकीय क्षेत्रात काम करीत आसतानाची सभ्यता व वर्तुणुक स्व आबासाहेबांच्या कार्यातुन शिकण्यासारखी–डाँ बाबासाहेब देशमुख

Breaking News

राजकीय क्षेत्रात काम करीत आसतानाची सभ्यता व वर्तुणुक स्व आबासाहेबांच्या कार्यातुन शिकण्यासारखी–डाँ बाबासाहेब देशमुख

 राजकीय क्षेत्रात काम करीत आसतानाची सभ्यता व वर्तुणुक स्व आबासाहेबांच्या कार्यातुन शिकण्यासारखी–डाँ बाबासाहेब देशमुख 

सांगोला प्रतिनिधी राजकारण हे सामाजातील  शेवटच्या घटकांसहित सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी तसेच सामाजीक समतोलत राखण्यासाठी करावयाचा आसते.त्यासाठी सभ्यता अंगी आसणे महत्वाचे आहे तसेच वर्तन ही चांगले आसायला हवे.सभ्यता व वर्तन हेच राजकीय क्षेत्रामद्ये काम करणार्या नेत्यांनसाठी व कार्यकरत्यांनसाठी महत्वाची बाब आहे.ति सभ्यता व चांगले वर्तन  स्व आबासाहेबांच्या कार्यातुन सतत डोळ्यासमोर येते.


सध्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे नेते कार्यकर्ते हे प्रसिध्दीच्या हव्यासापोटी व पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष स्वताकडे केंद्रीत करुन घेण्यासाठी नको त्या शब्दांचा  वापर करीत आसताना पहावयास मिळत आहे .तसेच खोट्या प्रसिध्दी साठी दुसर्यावरती वारेमाप टिका करताना दिसत आहेत.राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत आसताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप हे लोकशाहीमध्ये होणार त्यास कोणाची हरकत  आसण्याचे कारण नाही.परंतु टिका टिपण्णी ही वयक्तीक स्वरुपाची व द्वेषापोटी करणे राजकारणात आपेक्षीत नसते.परंतु काही नेते सध्या पुर्णता सभ्यता सोडुन बोलताना दिसत आहेत.व त्यांचा आशा बोलण्याला सोशल मीडीयावरती, टिव्ही वरती, वर्तमान ‌पत्रामध्ये ही प्रसिद्धी मिळत असते याला अपवाद फक्त आबासाहेब 


  सांगोल्याचे 55 वर्षे आमदार म्हणुन नेतृत्व करणारे  स्व आबासाहेब यांनी राजकारणातील सभ्यता व चांगली वर्तवणुक कायम राखली होती.सभ्यता म्हणजे फक्त साध्या पध्दतीचे राहणीमान नव्हे तर साध्या राहणीमानाबरोबरच ऊच्छ विचारसरणी अंगीकारणे व ती कायम राखण्याचे काम त्यांनी केले तसेच स्व आबासाहेब हे एवढ्या प्रदिर्घकाळ आमदार म्हणुन काम करीत आसताना केंव्हाही सभाग्रहात  वयक्तीक द्वेषाने कोणावरती टिका टिपण्णी केलेली नव्हती.फक्त चुकीच्या धोरणावरती आक्षेप घ्यायचे व सरकारने घेतलेले निर्णय कसे चुकीचे आहेत हे आभ्यासु पणे मांडायचे तसेच सभाग्रहाबाहेर कुठल्याही कार्यक्रमात कदीही त्यांनी चुकीच्या भाषेचा वापर केल्याचे एकही ऊदाहरण नाही त्यांनी  वयक्तीक टिका तर कदीही  केली नाही.तसेच कुठल्याही चुकीच्या शब्दाचा वापर केला नाही. एवढी सभ्यता स्व आबासाहेबांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत आसताना राखली होती.


सध्याच्या राजकारणामध्ये आनेक नेते कार्यकर्ते वरीष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा आभ्यासाचा विचार न करता नको त्या प्रकारची टिका टिपण्णी करताना पहावयास मिळत आहेत नको त्या शब्दांचा वापर करताना दिसत आहेत त्याचप्रमाणे  श जे नेते कार्यकर्ते नवीनच राजकारणामध्ये पदार्पण करीत आहेत कींवा राजकारणामध्ये सक्रीय आहेत त्यांनाही अनुभवी नेत्यांनी चुकीच्या शब्दांचा वापर करणे टाळावे.कारण त्या नवीन नेते कार्यकर्ते यांच्या मनोधैर्यावर विपरीत परीणाम होऊ शकतो प्रत्येकांनी आपापल्या ठिकाणी स्वताची आचारसंहिता घालुन घेऊन राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत राहीले पाहीजे हे महाराष्ट्रात स्व आबासाहेबांनी दाखवुन दिले आशा चांगल्या वर्तुणीकीचे व सभ्यतेचे ते एक मुर्तीमंद ऊदाहरण होते  आपणही स्व आबासाहेबांप्रमाणेच सभ्यता व वर्तन अंगीकारले तर चांगल्या प्रकारची जनसेवा आपल्याही हातुन घडेल आसा ठाम विश्वास मला स्वताःला वाटतो आहे.


 राजकारणामध्ये काम करीत आसताना जनसेवा हेच ध्येय स्व आबासाहेबांनी डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यामुळे त्यांना दिर्घकाळ जनतेचे प्रेम मीळाले त्याच बरोबर ईतरही राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संमंध होते.त्यांनी सांगोला तालुक्यात एवढामोठा विकासाचा डोंगर ऊभा केलेला आहे तो करीत आसताना ते काही काळ वगळता ते कायम विरोधी पक्षात राहीले आहेत तरीही त्यांनी आनेक संस्था,आनेक प्रकल्प ऊभे केले व ते चालवुन दाखवले हे काम करीत आसताना राजकीय पक्षातील ईतर नेत्यांशी एवढे चांगले व सलोख्याचे संमंध ठेवले की त्यांना राजकारणातील अजातशत्रु म्हणुन ओळखले जात आसे आशा डोंगराएवढ्या केलेल्या विकास कामासाठी  त्यांना स्वताःची चांगली वर्तुणुक व सभ्यताच कामी आली आहे. 


त्याच प्रमाणे हयातभर एकाच पक्षात राहुन ते ही कायम विरोधी पक्षात तरीही त्यांनी शेतकरीकामगार पक्षावरची निष्ठा तुसभरही ढळु दिली नाही.शाहु फुले आंबेडकर यांना अभिप्रेत आसलेले पुरोगामी विचार घराघरापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले आहे तोच पुरोगामी विचाराचा वारसा कायम राखुन समाजामध्ये सर्व धर्म समभावाची भावना रुजवण्यासाठी व जातीवाद संपवण्यासाठी स्व आबासाहेबांनी सतत प्रयत्न केलेत आसे आबासाहेबांचे सभ्य वर्तन होते.हेच वर्तन व आशीच सभ्यता,पक्षाप्रती होती त्यांच्या निष्ठेपुढे तर भले भले झुकतील आशी त्यांची निष्ठा होती


राजकीय व सामाजीक क्षेत्रामध्ये जे काम करु पहातात त्या माझ्यासहित ईतरांनीही यशस्वी राजकीय वाटच करावयाची आसेल तर स्व आबासाहेबांची वर्तुणुक व सभ्यता याचा आभ्यास करुन त्यांच्या आदर्षावरती वाटचाल केल्यास आपणास ही स्व आबासाहेबासारखे जनतेचे प्रेम मिळेल आसे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments