google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बोंबला ! मुलाचा सावत्र आईवर जडला जीव , लग्नही केलं ; वडील रडत पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये ...

Breaking News

बोंबला ! मुलाचा सावत्र आईवर जडला जीव , लग्नही केलं ; वडील रडत पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये ...

बोंबला ! मुलाचा सावत्र आईवर जडला जीव , लग्नही केलं ; वडील रडत पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये ...

 उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यात नात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने चक्क आपल्या सावत्र आईशीच लग्न केल्याची घटना घडली. ही घटना लोकांना तेव्हा समजली जेव्हा महिलेच्या पतीने पोलीस स्टेशन गाठून मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या आई-मुलाचे लग्न हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.


हे प्रकरण जिल्ह्यातील बाजपूर येथील आहे. इकडे पीडित व्यक्तीनं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत ११ वर्षांपूर्वी दुसरं लग्न केल्याचं म्हटलं आहे. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. दुसऱ्या लग्नानंतर त्याची दोन्ही मुले त्यांना सोडून गेली. दुसऱ्या पत्नीला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले आहेत. यादरम्यान पहिल्या पत्नीच्या मुलांचे घरी येणे-जाणे सुरूच होते. सगळे जण एका कुटुंबासारखे राहत होते.


दरम्यान, आपली पत्नी माहेरी गेली होती. परंतु अनेक दिवस ती न परतल्यानं आपण तिला घ्यायला गेलो. त्यावेळी ती आपल्या मुलासह राहत होती, असा आरोप त्या व्यक्तीनं केला आहे. आपल्या मुलानं सावत्र आईसोबतच लग्न केलं आहे. दोघंही एकत्र राहतात. जेव्हा पत्नीला घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो तेव्हा मारहाण करण्यात आली. पत्नीनंही परतण्यास नकार दिल्याचं त्या व्यक्तीनं सांगितलं. याशिवाय त्यानं आपल्या पत्नीवर २० हजार रुपये घेऊन गेल्याचा आरोपही केला आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments