बलवडी विकास सेवा सोसायटी वर शेकापचा झेंडा १३ पैकी १३ जागेवर दणदणीत विजय
सांगोला (प्रतिनिधी) बलवडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर शेतकरी कामगार पक्षाने फडकविला झेंडा. नुकतीच शनिवार दिनांक 14 मे रोजी बलवडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची संचालक पदाची निवडणक हे प्रक्रिया पार पडली. अतिशय चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने बलवडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर दणदणीत विजय संपादन करून विजयश्री खेचून आणली आहे 13 पैकी 13 जागेवर शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना आघाडीने विजय संपादन करून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या आघाडी चा दारुण पराभव केला आहे.
अतिशय चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीत शेकाप - शिवसेना आघाडीचे नेतृत्व शेकापचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच विजय (दादा) शिंदे यांनी केले. विजय दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
सर्वच्या सर्व १३ जागेवर शेकाप - शिवसेना आघाडीच्या उमेदवारांनी विरोधकांचा दारुण पराभव करीत मोठया मताधिक्याने विजय संपादन केला आहे. विजयी झालेल्या १३ पैकी दहा उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे असून तीन ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.विरोधी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आघाडीच्या उमेदवारांना एकाही जागेवर विजय संपादन करता न आल्याने मोठी नामुष्की ओढवली आहे.
शेकाप - शिवसेना आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे खुळपे भारत रामचंद्र, धायगुडे जयसिंग दत्तात्रय, बदडे सुभाष मोतीराम, शिंदे कुसुम नामदेव, शिंदे पारूबाई शंकर, शिंदे महादेव विठोबा, शिंदे शिवाजी बंडू, सांगोलकर लक्ष्मण निवृत्ती, पवार सखुबाई बाबुराव, मोहिते सविता चंद्रकांत, कळवात मनसूब इमाम, करडे शंकर नामदेव,
0 Comments