google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ८, ९ मे रोजी कमाल तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे; उष्णतेच्या लाटेची शक्यता!

Breaking News

८, ९ मे रोजी कमाल तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे; उष्णतेच्या लाटेची शक्यता!

 ८, ९ मे रोजी कमाल तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे; उष्णतेच्या लाटेची शक्यता!

पुणे : देशातील बहुतांश भागात सध्या पावसाळी स्थिती निर्माण झाली असून, महाराष्ट्रातील कमाल तापमान देशातील उच्चांकी पातळीवर आहे. प्रामुख्याने विदर्भात बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा ४४ अंशांच्या आसपास आहे. याच विभागात ८, ९ मे रोजी तुरळक भागात पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता असून, पुढील तीन ते चार दिवसांच्या कालावधीत तापमानाचा पारा काही प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.


तसेच, एप्रिल महिन्यामध्ये विदर्भात ४५ ते ४६ अंशांच्या पुढे तापमानाची नोंद झाली होती. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही ४४ ते ४५ अंशांपुढे तापमान गेले होते. राजस्थान आणि मध्य प्रदेशाच्या बरोबरीने तापमानाची नोंद महाराष्ट्रात झाली होती. सध्या उत्तरेकडील बहुतांश भागात पावसाळी वातावरण आहे. त्यातही तापमानातील वाढ सुरू आहे.

Post a Comment

0 Comments