प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
सांगोला (प्रतिनिधी) : सांगोले नगरीचे माजी नगराध्यक्ष, महाराष्ट्र विरशैव सभा प्रांतिक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी प्रांतिक सदस्य, आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ ड १ चे माजी प्रांतपाल, सां.ता. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष व विद्यामंदिर परिवाराचे मार्गदर्शक लायन्स
क्लब, महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर सांगोला शाखांचे ऊर्जाकेंद्र एक संवेदनशील व्यक्तिमत्व मा. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिर शुक्रवार दि. २० मे २०२२ रोजी कोळा, शनिवार २१ मे रोजी नाझरा, लोणविरे व सोमवार २३ मे २०२२ रोजी सांगोला येथे सकाळी ८.०० ते सायं. ६.०० या वेळेत संपन्न होणार आहे.
तरी सांगोला तालुक्यातील सर्व सेवाभावी संस्था व शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला, क्रीडा आदि क्षेत्रातील सर्वांनी रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा विचार प्रमाण मानून जास्तीत जास्त सांगोला शहर व परिसरातील नागरिकांनी रक्तदान करावे व मानवतेच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन लायन्स क्लब सांगोला व विद्यामंदिर परिवार यांचे वतीने करण्यात येत आहे.


0 Comments