google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Breaking News

सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

 सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहर व ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस झाला. उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आह. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने बळीराजाला मात्र फटका बसला आहे.


 शेतकऱ्यांच्या द्राक्ष, डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत., आंबा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी वाऱ्याने कडब्याच्या ढेपणी उडून गेल्या आहेत.


सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मागील दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाला होता. ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम असताना पावसाने हजेरी लावली. 


गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तालुक्याच्या काही भागात रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरु होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहिसा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.

Post a Comment

0 Comments