धक्कादायक बातमी साईड न दिल्याने तरुणाचा खून
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात फिरायला जात असलेल्या तरुणाने मोटारसायकलला जाण्यास साईड न दिल्याने चिडून तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . यात सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३८, रा. तुंगी ता़ मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.ही धक्कादायक घटना उरवडे ते लवासा रोडवर आंदगावातील तक्षशिलानगर येथे जाणार्या रस्त्यावर रविवार दुपारी दीड वाजता घडली.
सदर प्रकरणी राजेश अंकुश कुंवर (वय ३१, रा. भुशी, रामनगर, लोणावळा) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७३/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोन मोटारसायकलवरील तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ सुभाष वाघमारे मोटारसायकलवरुन जात होते. यावेळी एकाला फिर्यादीच्ने साईड न दिल्याच्या कारणावरुन त्यांच्या वाद सुरु झाला.
त्याने फिर्यादी यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेऊन त्यांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण केला. त्याने व दुसर्या मोटारसायकलवरुन आलेले दोघे अशा तिघांनी सुभाष वाघमारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव तपास करीत आहेत.
0 Comments