google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! सावकाराच्या जाचास कंटाळून 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाची आत्महत्या

Breaking News

धक्कादायक! सावकाराच्या जाचास कंटाळून 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाची आत्महत्या

 धक्कादायक! सावकाराच्या जाचास कंटाळून 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाची आत्महत्या

बीड :-खाजगी सावकारांकडून घेतलेले पैसे व्याजासह देऊनही, कुटुंबियांना सावकाराकडून दिला जाणारा त्रास असाह्य झाल्याने, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थी तरुणाने, गळफास घेऊन स्वतः जीवन संपवलं आहे. “मी हे सहन करू शकत नाही, मला माफ करा”. असा व्हॉट्सअॅप मेसेज कुटुंबियांना करत त्याने आत्महत्या केली आहे. तर याप्रकरणी २ आठवड्यानंतर, बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये, ५ सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज बबन काळे (वय- २१) रा. जिजामाता चौक बीड, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.


मयत पंकजचे वडील बबन काळे हे माजलगाव पंचायत समितीत विस्ताराधिकारी आहेत. त्यांनी २०१९ मध्ये १० रुपये शेकडा दराने, किशोर बाजीराव पिंगळे या सावकाराकडून ७ लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील ६० आर जमीन आणि बीड शहरातील पत्नीच्या नावे असणारे राहते घर सावकार पिंगळे याने लिहून नोटरी करून घेतले होते. त्यानंतर व्याजासह मूळ रक्कम पिंगळे यास देऊनही, सावकार पिंगळे याने बबन काळे यांच्या पत्नीवर धनादेश न वटल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर १ मे रोजी विस्ताराधिकारी असणारे, बबन काळे हे माजलगावला ध्वजारोहणासाठी गेले होते. त्या दिवशी कुटुंबातील व्यक्ती देखील बाहेर होते. मात्र, मयत पंकज हा एकटाच घरी होता. सावकाराकडून घरी येऊन सततची धमकी, मारहाण याला वैतागून शेवटी पंकजने कुटुंबीयांना व्हाट्सअपद्वारे मेसेज करून, घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


याप्रकरणी मयत पंकज याचे वडील बबन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, किशोर पिंगळे, रंणजीत पिंगळे, राजकुमार गुरखुदे, हनुमंत उर्फ बंडू पिंगळे आणि आशिष सोनी यांच्याविरोधात, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एक सावकाराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, ४ सावकार अद्यापही फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments