विद्यार्थिनीला 200 फूट ओढत नेलं आणि नंतर केली निर्घृण हत्या?…..
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना औरंगाबाद मधून समोर आली आहे.भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.दरम्यान औरंगाबाद शहर खुनाच्या घटनांनी हादरले आहे.गेल्या २४ तासात शहरात दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन भागात भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.एकतर्फी प्रेमातून हि हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.ग्रंथी सुखप्रीत कव्हर प्रितपालसिंग ( वय २२ वर्षे ) असे मृत हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.
बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत असलेल्या ग्रंथीचा आज देवगिरी महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात मृतदेह आढळून आला आहे. तर या तरुणीचा अंगावर जखमा पाहायला मिलाळ्या असून धारदार शस्त्राने तिची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.यामध्ये आरोपीने तरुणीला कॉलेजपासून चक्क २०० फूट ओढत नेत तिची हत्या केली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून हा खून करण्यात आल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून आरोपीच्या शोधात पथक तैनात करण्यात आले आहे.भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात पोलिसांचा धाक उरला आहे का असा सवाल नागरिक विचारू लागलेय.


0 Comments