सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस शुक्रवारपासून 17 दिवस बंद ; आता खासगी वाहन, एसटीने गाठावे लागेल पुणे
सोलापूर दौंड ते सोलापूर दरम्यान ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेतल्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत, काहीअंशी रद्द केल्या तर काही गाड्यांचे मार्ग बदलले गेले आहेत. त्यात सोलापुरातून पुण्याला जाणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेस व डेमू रेल्वे गाडीचाही समावेश आहे. मुंबई-पंढरपूर गाडीही रद्द झाली आहे. उद्यान एक्स्प्रेस ही रेल्वे साेलापूरपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे एेन उन्हाळी सुटीत साेलापूरकरांच्या प्रवासांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पुण्याला रेल्वेने सकाळी निघायचे जवळपास मार्ग बंदच झाले आहेत. त्यामुळे खासगी वाहन, एसटीने पुणे गाठावे लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या साेलापूर विभागाच्या वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर विभागाने सोलापूरच्या दिशेच्या बाजूस दौंड यार्डमध्ये सबवे (रोड अन्डर ब्रीज) बांधण्यासाठी १३ ते २९ मे या १७ दिवसांसाठी वेगवेगळ्या कालावधीकरिता ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दरम्यान सोलापूर विभागातून धावणाऱ्या काही गाड्या रद्द, काहीअंशी रद्द तर काही मार्ग वऴवून धावणार आहेत.
हुतात्मा, डेमू रद्द, शताब्दी, इंटरसिटी बंदच साेलापूर विभागातून पुण्यासाठी दरराेज सकाळी साडेसहा वाजता धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी १३ मे ते २९ मे या दिवसासाठी रद्द केली अहे. याच कालावधीसाठी साेलापुर-पुणे डेमू रेल्वे गाडीही रद्द करण्यात आली आहे. २५ मे ते २८ मे या दरम्यान मुंबई-बेंगलोर उद्यान एक्सप्रेस सोलापूरपर्यंतच धावणार आहे. २६ मे ते २९ मे या दरम्यान मुंबई-बेंगलोर उद्यान एक्सप्रेस सोलापूर स्थानकाहून आपल्या ठरलेल्या वेळत सुटेल.
साेलापूरहुन पुण्याला जाण्यासाठी दुपारची इंद्रायणी एक्स्प्रेस बंदच आहे* हैद्राबाद ते पुणे ही शताब्दी एक्स्प्रेसही बंद आहे. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेसनेच प्रवास करावा लागत होता. पण आता १७ दिवस ती गाडीही रद्द झाली आहे. मात्र सोलापूरकडून दक्षिणेकडे जाणा-या किंवा नगरकडे जाणा-या मार्गावरील ट्रेन धावतील. त्यात अडचणी नाहीत.
काही काळासाठी या रेल्वेगाड्या केल्या आहेत रद्द१२ मे ते २८ मे दरम्यान इंदोर-दौंड एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यत, हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस बार्शी टाऊन स्थानकापर्यंत धावेल
या गाड्या सोलापूर ऐवजी मिरज, कुर्डुवाडीमार्गे धावतील काही गाड्या सोलापूरएेवजी मिरज, पुणे, कुर्डुवाडी या मार्गावरून वळविल्यात. १२ ते २९ मे विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस, २५ मे ते २९ मे काकिनाडा पोर्ट- लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेस, २५ मे ते २८ मे मुंबई- नागरकोईल एक्स्प्रेस, २८ मे राेजी तिरूवनंतपुरम सेंट्रल-मुंबई, पुणे- भुवनेश्वर, २७ मे राेजी लोकमान्य टिळक टर्मिनल – कराईकल, २७ मे साईनगर शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेस
२५ मे ते २८ मे दरम्यान मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस ही सोलापूरपर्यंतच धावेल, नांदेड-पनवेल एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकापर्यंत धावेल, २६ मे ते २९ मे मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेसही सोलापूर स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल. पनवेल-नांदेड एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकाहून ठरलेल्या वेळेवर सुटेल.
दौंड येथे चालणार काम, ५० गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम
२६ ते २९ मे दरम्यान मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस एक तास उशिराने धावेल. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने, मुंबई-चेन्नई दोन तास उशिरा धावेल.
१३ मे राजी साईनगर शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेस अडीच तास उशिरा, १६ मे राजी कराईकल-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस एक तास तास उशिराने धावेल.
१३ मे ते १७ मे दरम्यान मुंबई –बंगळुरू एक्स्प्रेस ही दोन तास उशिराने, १२ ते १६ मे बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेस, १२ मे १७ मे नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस, १३ ते १६ मे दरम्यान नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस एक तास दहा मिनिटे उशिराने धावेल. १४ मे राजी सेंट्रल -मुंबई एक्स्प्रेस या गाड्या एक तास दहा मिनिटे उशिराने धावतील.
उद्यान, नागरकोईल १३ ते १७ मे दरम्यान उशिराने धावणार*
रद्द करण्यात आलेल्या गाड्या : १४ मे ते २८ मे पंढरपूर-दादर एक्स्प्रेस, १३ मे ते २९ मे दरम्यान सोलापूर-पुणे हुतात्मा,सोलापूर-पुणे डेमू , पुणे, दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, बारामती ते दौंड, दौंड-पुणे डेमू, दौंड-पुणे शटल, बारामती-पुणे डेमू, पुणे- बारामती डेमू, पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस, सोलापूर डेमू, पुणे-दौंड डेमू, १९ मे ते २६ मे दरम्यान पुणे-भुसावळ स्पेशल, भुसावळ- पुणे, दौंड-बारामती डेमू, पुणे-निझामाबाद डेमू, पुणे-दौंड डेमू, दौंड-पुणे डेमू रद्द, निझामाबाद- पुणे डेमू, पुणे-दौंड, बारामती-दौंड पॅसंेजर, निझामाबाद-पंढरपूर, पंढरपूर- निझामाबाद,
वरील सर्व माहिती रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे.
0 Comments