google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेचा भूजल पातळी वाढवण्यासाठी मोठा पुढाकार. आजअखेर 100 पेक्षा जास्त शोष खड्डयांची निर्मिती ! -कैलास केंद्रे मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद

Breaking News

सांगोला नगरपरिषदेचा भूजल पातळी वाढवण्यासाठी मोठा पुढाकार. आजअखेर 100 पेक्षा जास्त शोष खड्डयांची निर्मिती ! -कैलास केंद्रे मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद

 सांगोला नगरपरिषदेचा भूजल पातळी वाढवण्यासाठी मोठा पुढाकार. आजअखेर 100 पेक्षा जास्त शोष खड्डयांची निर्मिती ! -कैलास केंद्रे मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद


सांगोला नगरपरिषदेचा भूजल पातळी वाढवण्यासाठी  मोठा पुढाकार. 

आजअखेर 100 पेक्षा जास्त शोष खड्डयांची निर्मिती ! -कैलास केंद्रे मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद

       सांगोला (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पृथ्वी, जल, आकाश,वायू,अग्नी या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये सांगोले नगरपरिषदेमार्फत  पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणेसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. *जल* या घटकांतर्गत पावसाचे पाणी वाहून जाऊन त्याचा अपव्यय टाळण्यासाठी व जमिनीतील पाणी पातळी वाढावी या उद्देशाने नगरपरिषदेमार्फत शहरात ठिकठिकाणी शोषखड्डे तयार करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.


   सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे. पाणी हा मनुष्याला, प्राण्यांना,पक्ष्यांना व आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांना जगण्यासाठी आवश्यक घटक आहे.आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याची गरज ही लागतेच.शेती पिकवण्यासाठी, उद्योगधंदे चालवण्यासाठी, वीजनिर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते.पाणी हेच जीवन म्हंटले जाते कारण पृथ्वीतलावर पिण्याच्या पाण्याचे प्रमाण हे फक्त 3 टक्के एवढे आहे.आजकाल वृक्ष तोडीमुळे पाऊस अनियमित पडत आहे.पाऊस कमी पडल्यामुळे व पाणी वापराचे व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. पाण्याचे मर्यादित साठे त्यात वाढती लोकसंख्या,औद्योगिकरण,कमी पाऊस,तापमान वाढ,जलप्रदूषण यामुळे पाण्याची खूप टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाण्याचे व्यवस्थित नियोजन, पाणी संवर्धनासाठी व भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे.


    विहिरी,कूपनलिका,तलाव,नद्या ओढे  अशा अनेक स्रोतापासून आपल्याला पाणी मिळत असते. या स्रोताना जिवंत ठेवायचे असेल तर भूजल पातळी चांगली असणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 2.0 अभियानाअंतर्गत "पाणी अडवा, पाणी जिरवा" या धर्तीवर सांगोला नगरपरिषद मार्फत शहरात विविध ठिकाणी शोषखड्डे निर्मिती करण्यात आली आहे.सुरुवातीला मोकळ्या जागांवर खड्डे खोदण्यात आले असून या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शोषले जाऊन जमिनीतील पाणीपातळी वाढावी म्हणून खडी व दगडांचे मोठे खडे टाकण्यात आले आहेत. यामुळे पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर जमिनीच्या वरच्या कठीण आवरणामुळे  वाहून न जाता या शोषखड्ड्या मध्ये मुरले जाणार आहे. परिणामी जल संवर्धन व भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन येत्या काळात सांगोला शहराची दुष्काळमुक्त शहर अशी ओळख निर्माण होण्यास नक्की हातभार लागणार आहे.


     माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शोष खड्यांद्वारे भूजल पातळी वाढविण्याचा हा उपक्रम अत्यंत क्रांतिकारी असून याचा दृश्य परिणाम काही वर्षांनी नक्की पहावयास मिळेल.वृक्ष लागवड,संवर्धनाच्या जोडीला भूजल पातळी वाढविण्याचा हा उपक्रम सांगोला शहराची हरित,दुष्काळ मुक्त शहर अशी ओळख निर्माण करण्यात महत्वाचा ठरेल यात शंका नाही.


कैलास केंद्रे मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद

Post a Comment

0 Comments